वडाळीत धोकादायक जलसफर !

By admin | Published: February 13, 2016 12:13 AM2016-02-13T00:13:13+5:302016-02-13T00:13:13+5:30

महानगरपालिकेच्या हरिभाऊ कलोती उद्यान वडळी तलावाचा कंत्राट यवतमाळ राजहंस ट्रॅव्हल्स टुरिझमला मिळाला असून पर्यटकांना त्यांच्या प्रकृतीनुसार मापाचे सुरक्षा जॅकेट पुरविण्यास अपयशी ठरत आहे.

Dangerous water tank in Wadali! | वडाळीत धोकादायक जलसफर !

वडाळीत धोकादायक जलसफर !

Next

संदीप मानकर अमरावती
महानगरपालिकेच्या हरिभाऊ कलोती उद्यान वडळी तलावाचा कंत्राट यवतमाळ राजहंस ट्रॅव्हल्स टुरिझमला मिळाला असून पर्यटकांना त्यांच्या प्रकृतीनुसार मापाचे सुरक्षा जॅकेट पुरविण्यास अपयशी ठरत आहे. प्रशिक्षित बोटचालकांकडून पर्यटकांना बोटीत बसण्यापूर्वी समुपदेशन करण्यात येत नाही. त्यामुळे पर्यटकांच्या जिवाला धोका संभवतो. त्यामुळे बोट पाण्यात बुडून मोठा अपघात झाला, तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.
टूरिझमकडे १० पायडल व २ मोटरबोट आहेत. १ पायडल व १ स्कुटर बोट नादुरुस्त असल्याचे समजते. येथे ८५ सुरक्षा जॅकेट आहेत. एका मोटरबोटमध्ये एकाचवेळी ९ व्यक्ती, तलावात फिरण्याचा आनंद घेऊ शकतात. येथे असलेले सेफ्टी, जॅकेट अनेक पर्यटकांना होतच नाहीत. कारण लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वच बोटीतून तलाव भ्रमण करतात. रविवारी प्रतिनिधीने पाहणी केली असता सुरक्षा जॅकेट तर घातला. पण अनेकांनी जॅकेटचा बेल्ट बांधला नव्हता. त्यांनी बेल्ट बांधल्याची खात्रीदेखील बोटचालकाने केलेली नव्हती.
मोटर व पायडल बोटमध्ये बसल्यानंतर जॅकेटचा बेल्ट कसा बांधावा, पाण्यात हालचाली कशा असायला पाहिजे. जर बोट पाण्यात बुडून अपघात झालाच तर सुरक्षा जॅकेटचा उपयोग करुन पाण्यातून कसे बाहेर पडावे, यासंदर्भाचे कुठलेही मार्गदर्शन प्रशिक्षित मोटरबोट चालकांकडून पर्यटकांना करण्यात आले नव्हते व नियमाने ते करणे गरजेचे आहे. रविवारी पंचक्रोशीतील पर्यटकांनी वडाळी तलावावर गर्दी केली होती. ३० रुपये प्रति व्यक्ती एका फैरीचा शुल्क येथे नागरिकांकडून आकारण्यात येतो.

महापालिकेने
तलावातील गाळ काढावा

तलावातील पाणी जरी खोल असेल तरी तलावाच्या भिंतीलगत प्रचंड गाळ साचला आहे. अचानक अपघात झाल्यास गाळात अडकून मृत्यू होऊ शकतो म्हणून गाळ काढण्याची मागणी आहे.

नियम काय महणतात ?
पाण्यात बोटींग करण्यापूर्वी, टूरिझमच्या संचालकांनी पोलीस विभागाचे व महानगरपालिकेचे ना हरकरत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा स्कुटरबोट व पायडल बोटींगमध्ये पर्यटक बसू नये, प्रत्येक पर्यटकांना बोटींग करण्यापूर्वा सुरक्षतेचे समुपदेशन करून सेफ्टी बेल्ट कसे बांधावे यासंदर्भात मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. नागरिकांना बचाव करता येईल, असे मार्गदर्शक फलक लावणे अनिवार्य आहे.

बोटींग चालविताना नियमांचे पालन करणे गरजचे आहे. नियमबाह्य काम होत असेल तर तपासणी करण्यात येईल. पर्याटकांना त्यांच्या शरीराच्या मापाचे सुरक्षा जॅकेट देणे अनिर्वाय आहे. यावर नियंत्रकांचे लक्ष असायला हवे.
- आनंद जोशी,
अभियंता महापालिका, अमरावती.

Web Title: Dangerous water tank in Wadali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.