अस्वलाची दहशत, ग्रामस्थांची रात्रभर गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:07 PM2018-02-04T23:07:26+5:302018-02-04T23:07:50+5:30

नजीकच्या धामणगाव गढी येथे शेतात ओलितासाठी गेलेल्या शेतकऱ्याला अस्वल दिसले.

Dangers of bears, patrols patrol overnight | अस्वलाची दहशत, ग्रामस्थांची रात्रभर गस्त

अस्वलाची दहशत, ग्रामस्थांची रात्रभर गस्त

Next
ठळक मुद्देधामणगाव गढी येथील घटना : वनविभागाचे नागरिकांना आवाहन

आॅनलाईन लोकमत
परतवाडा : नजीकच्या धामणगाव गढी येथे शेतात ओलितासाठी गेलेल्या शेतकऱ्याला अस्वल दिसले. त्याने थबकून तिच्यावर पाळत ठेवली. अस्वल आंब्याच्या झाडावर चढताच गावकऱ्यांना माहिती दिली आणि अख्खी रात्र वनकर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांनी दहशतीत घालविली.
धामणगाव गढी येथील शेतकरी गजानन झामरे हे देवगाव रस्त्यावरील शेतात चंद्रभागा कालवा परिसरातून शनिवारी रात्री १० वाजता जात होते. एक धिप्पाड अस्वल त्यांच्या दृष्टीस पडले. झामरे यांनी गावकऱ्यांना कळविले. अस्वल पाहण्यासाठी कुणी शेकोटी पेटविली, काहींनी बॅटरी घेऊन अस्वल शोधू लागले. काहींनी वनविभागाला माहिती दिली. नागरिकांनी रात्र अस्वलीच्या दहशतीत काढली.
शेतकरी दहशतीखाली
धामणगाव, गढी, देवगाव, वडगाव, एकलासपूर, धोतरखेडा तर अंजनगाव नजिकच्या शहापूर, दहीगाव, गरजदरी परिसरात अस्वलाने गत महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे. गत पंधरवाड्यात दोघांना गंभीर जखमी केल्याने रात्री ओलितासाठी जाणाºया शेतकºयांमध्ये दहशत पसरली आहे. शेतात जाताना सावधगिरी बाळगावे, असे आवाहन परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांनी शेतकºयांना केले.
पहाटे ४ वाजता उतरले अस्वल
शनिवारी रात्री झाडावर चढलेले अस्वल रविवारी पहाटे चार वाजता उतरले आणि त्याने नजीकच्या चिखलदरा परिसरातील जंगलाकडे धूम ठोकली. रात्रभर वनपाल झामरे, पाथ्रीकर, वनमजूर आदींनी रात्रभर अस्वलाचा पहारा केला.

धामणगाव गढी व दहीगाव परिसरातील नागरिकांनी अस्वलपासून सावध राहावे, रात्री शेतात एकटे जाण्याचे टाळावे.
- शंकर बारखडे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा

Web Title: Dangers of bears, patrols patrol overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.