चैतन्य कॉलनीत डेंग्यूचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:03 PM2018-08-08T23:03:26+5:302018-08-08T23:03:52+5:30

शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असतानाच चैतन्य कॉलनीतही डेंग्यूने उच्छाद मांडल्याची स्थिती आहे. महापालिकेला प्राप्त रक्तजल नमुन्यांच्या अहवालात चैतन्य कॉलनीतील पाच रहिवासी डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा डेंग्यू संदर्भातील उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याची दिसून येत आहे.

Dangue bleeding in the Chaitanya colony | चैतन्य कॉलनीत डेंग्यूचा उच्छाद

चैतन्य कॉलनीत डेंग्यूचा उच्छाद

Next
ठळक मुद्देपाच रुग्ण पॉझिटिव्ह : आरोग्य यंत्रणा उपाययोजनेत अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असतानाच चैतन्य कॉलनीतही डेंग्यूने उच्छाद मांडल्याची स्थिती आहे. महापालिकेला प्राप्त रक्तजल नमुन्यांच्या अहवालात चैतन्य कॉलनीतील पाच रहिवासी डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा डेंग्यू संदर्भातील उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याची दिसून येत आहे.
शहरात विषाणुजन्य तापाने फणफणत असताना महापालिका प्रशासन गाढ निदे्रत होते. पहिल्यादा पार्वतीनगरात डेंग्युचा उच्छाद असल्याचे निदर्शनास येताच आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. त्यानंतर प्रशासनाने वेगवान हालचाली सुरू केल्या. आरोग्य यंत्रणेने उन्हाळ्यातच उपाययोजना करायला हवे होते. आता स्थिती नियंत्रणाबाहेर जात असून, डेंग्युूो रुग्ण वाढतच आहे. चैतन्य कॉलनीतील डॉ. समिर चौधरी यांच्या रुग्णालयात बहुंताश डेंग्यू रुग्णांवर उपचार सुरू असून दोन रुग्णांना नागपूरला हलविण्यात आले. चैतन्य कॉलनी परिसर बाहेरून स्वच्छ दिसते. मात्र, काही खुल्या प्रागंणात पाणी साचलेले आहेत, तर झाडाझुडुपे वाढली आहेत. डासांचा उच्छाद कायम आहे. जनजागृतीअभावी नागरिकांनी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतलीच नसल्याचे आढळून आले.
येथे आहेत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण
शहरातील डॉ. सचिन काळे, डॉ.अद्वैत महल्ले, डॉ.मनोज निचत, डॉ.अजय डफळे डॉ.समीर चौधरी, डॉ.विजय बख्तार, डॉ.नीलेश पाचबुद्धे, रेडिएन्ट हॉस्पिटल आणि डॉ.बोंडे यांच्या रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे सर्व रुग्ण न्यू गणेशनगर, ख्रिस्त कॉलनी, रविनगर, चक्रधर नगर, चैतन्य कॉलनी, दस्तूर नगर, दत्त कॉलनी, देशपांडे ले-आऊट, यशोदा नगर, टेलिकॉम कॉलनी, पार्वती नगर नंबर १, अमर कॉलनी, वैशाली कॉलनी, श्री विकास कॉलनी, कवर नगर, गांधीनगर, राधा नगर येथील आहेत.

डेंग्यूचा आजार वेगवेगळ्या लक्षणांनी व नेते गंभीर स्वरूपात दिसून येत आहेत. नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्याचे निरीक्षण करावे. डास मुक्ती करण्यासाठी प्रयत्न करावे. या आजाराबद्दल सतर्क राहून उपाययोजना कराव्यात.
- डॉ. समीर चौधरी,
एमडी (मेडिसिन)

माझ्या घरातील तीन सदस्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यूबाबत आम्हाला काहीच माहीत नव्हते, माहीत असते तर आम्ही खबरदारी घेतली असती. मात्र, आमच्या परिसराकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
- मधुकर गाढे, चैतनकॉलनी

चैतन्य कॉलनीतील अस्वच्छता, वराहांचा वावर, झाडेझुडपे वाढलेली, महापालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष, रिकाम्या प्लॉटमध्ये साचलेले पाणी यामुळे विषाणुजन्य आजारासह डेंग्यूचे रुग्ण वाढले आहे.
- जयंत इंगळे, नागरिक

Web Title: Dangue bleeding in the Chaitanya colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.