दर्यापूर बुजले अतिक्रमणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:46 PM2017-10-04T23:46:12+5:302017-10-04T23:46:25+5:30

गत अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्यामुळे शहरातून पायी चालणेही कठीण झाले आहे.

Darirapur Burjla encroachment | दर्यापूर बुजले अतिक्रमणात

दर्यापूर बुजले अतिक्रमणात

googlenewsNext
ठळक मुद्देकधी राबविणार मोहिम? : नागरिक त्रस्त, अधिकारी सुस्त; पायी चालणेही कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : गत अनेक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अतिक्रमण वाढले आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असल्यामुळे शहरातून पायी चालणेही कठीण झाले आहे. मार्गाचे नूतनीकरण केल्यावर अतिक्रमण कमी होण्याची आशा नागरिकांना होती, ती मात्र फोल ठरली आहे.
शहरातील प्रमुख वर्दळीचे स्थान असलेल्या बसस्थानक परिसरात नियबाह्य पार्किंग केली जाते. यामुळे वाहनचालकांना व पादचाºयांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बसस्थानकाच्या चारही बाजूने भिंत घालण्यात आली आहे. यामुळे खासगी दुकानदारांनी थेट रस्त्यावर माल विक्री करणे सुरू केला आहे. अकोट मार्गावरील आदर्श हायस्कूल, रत्नाबाई कन्या शाळेसमोरसुद्धा खासगी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. यासंदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्यावरही कारवाई केली नाही. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. शहरातील विविध मार्गावर प्रवासी वाहने, काळीपिळी व मालवाहतुकीच्या गाड्या मधोमध उभ्या असतात. त्यामुळे शहरात दर दोन दिवसांनी अपघात घडतात. हे अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असले तरी नगर पालिकेच्या हद्दीतील सामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कारवाई केल्यास राजकीय हस्तक्षेप
अतिक्रमणावर प्रशासनाने कारवाई सुरू केल्यास स्थानिक राजकारणी यात आपला रस दाखविण्यास सुरुवात करतात. यामुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागते. यामुळे अतिक्रमण करणारे धाजावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे प्रशासन सर्वसामान्य जनतेसाठी आहे की राजकारण्यांचे दुकान चालविण्यासाठी, असा सवाल यानिमित्ताने नागरिक करीत आहेत.
फळविक्रेत्यांचेही अतिक्रमण
बसस्थानक परिसरात फळविक्रेते मुख्य रस्त्यापर्यंत हातगाड्या लावतात. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. याठिकाणी फळ विक्रेत्यांनी संपूर्ण रस्ताच व्यापला आहे. यामुळे येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नगर पालिकेतर्फे पूर्ण मदत केली जाईल.
- गीता वंजारी,
मुख्याधिकारी, दर्यापूर

काही महिन्यांपूर्वी शाळेसमोर असलेल्या अतिक्रमणामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यामुळे शाळेसमोरील अतिक्रमण काढण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
- राजेंद्र गायगोले,
मुख्याध्यापक, रत्नाबाई राठी कन्या शाळा, दर्यापूर

Web Title: Darirapur Burjla encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.