करजगावात अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:14 AM2021-09-26T04:14:10+5:302021-09-26T04:14:10+5:30
ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा कापला, कोट्यवधीची थकबाकी करजगाव : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयकडे महावितरणचे कोट्यवधी रुपये थकल्याने वीजपुरवठा कापण्यात आला आहे. त्यामुळे ...
ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा कापला, कोट्यवधीची थकबाकी
करजगाव : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयकडे महावितरणचे कोट्यवधी रुपये थकल्याने वीजपुरवठा कापण्यात आला आहे. त्यामुळे गाव अंधारात बुडाले आहे. यादरम्यान वीज भरणा केंद्र बंद असल्याने थकबाकीच्या वसुलीतील सातत्य हरविले आहे.
महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीला एक महिन्याआधी नोटीस बजावली होती. आता पथदिव्यांसह पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेलचा वीजपुरवठा खंडित केला. पथदिव्यापोटी ४९ लाख १३ हजार ९१४ रुपये, तर बोअरवेलचे २ कोटी २ लाख ३७ हजार ५१६ रुपये थकीत आहेत. यामुळे पुढील दोन दिवस अंधारात व पाणीपुरवठ्याविना राहावे लागणार आहे. ग्रामस्थांच्या घरगुती वीजवापरापोटीदेखील एक कोटी रुपये थकबाकी आहे. वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता अंबळकर यांनी केले. कारवाईत कनिष्ठ अभियंता बाळासाहेब खंडारे , धाडसे, शिवा घाडगे, देशमुखसह महावितरणचे कर्मचारी सहभागी झाले.
दरम्यान, गावात वीज बिल भरणा केंद्र नसल्याने घरगुती वीजग्राहकांना बिल भरणा करण्यास अडचणी येत आहेत. गावातील बँकांमध्ये असलेली वीज भरणा करण्याची सोय बंद झाल्याने या कारवाईला ग्राहकांना नाहक गैरसोय होत आहे.