दर्यापूरच्या हवाई सुंदरीने अफगाणिस्तानमधून १२९ भारतीयांना आणले सुखरूप मायदेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:18 AM2021-08-18T04:18:48+5:302021-08-18T04:18:48+5:30
अनंत बोबडे येवदा (अमरावती) : अफगाणिस्तानच्या भारतीय दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह तेथे राहणाऱ्या १२९ भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन ...
अनंत बोबडे
येवदा (अमरावती) : अफगाणिस्तानच्या भारतीय दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह तेथे राहणाऱ्या १२९ भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान भारतात दाखल झाले आहे. एआय २४४ या विमानाने सोमवारी सायंकाळी काबूल विमानतळाकडे उड्डाण घेतले होते. सपोर्टिंग स्टाफ म्हणून दर्यापूरची श्वेता चंद्रकांत शंके ही तरुणी या विमानासोबत एअर होस्टेस म्हणून गेली होती.
दर्यापूरच्या बाभळी परिसरातील चंद्रकांत शंके हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांना दोन मुली आहेत. श्वेता यांचे प्रबोधन विद्यालयात शिक्षण झाले आहे. अफगाणिस्तानात रविवारी तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राजधानी काबूलवर ताबा मिळवला. या घडामोडी सुरू असताना एअर इंडियाने विमान तेथे धाडले. ही तणावपूर्ण परिस्थिती श्वेता यांनी समर्थपणे हाताळली. जिवाची पर्वा न करता भारतीयांची सुटका करणे तसेच त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करीत मायदेशी आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
कोट
पाच वर्षांपासून एअर होस्टेसमध्ये श्वेता हवाई सुंदरी म्हणून कार्यरत आहे. या कामगिरीत तिचा सहभाग असल्याने तिचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
- डॉ. लक्ष्मीकांत शिंदे,
जावई, दर्यापूर