दारू दुकानाविरोधात दत्तापूरच्या महिला आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:49+5:302021-06-24T04:10:49+5:30
अमरावती : धामणगाव रेल्वे शहरातील एकवीरानगर येथे बीअर बार व शॉपीला परवानगी देऊ नये, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी ...
अमरावती : धामणगाव रेल्वे शहरातील एकवीरानगर येथे बीअर बार व शॉपीला परवानगी देऊ नये, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे.
दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकवीरानगर परिसरात बीअर बार व शॉपी सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वीच सबंधित नगर परिषद, तहसील आणि पोलीस ठाणे व नझूल कार्यालयाला नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे या परिसरात दारू दुकानाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. अशातच आता दारू दुकानाला परवानगी देण्यात हालचाली सुरू झाल्या आहेत. जनहिताच्या दृष्टीने प्रशासनाने कुठल्याही परिस्थिती दारू दुकानाला परवानगी देऊ नये. जर परवानगी देण्यात आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा २३ जून रोजी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. यावेळी छाया नागपुरे, जिजा वाघाडे, रेखा वानखडे, वैशाली गेडेकर, रत्ना भोयर, जया राऊत, संध्या बिजवे, माधुरी सुटे, सुनीता पुरोहित, रेखा उजवणे, सोनू उपासे, दुर्गा सलामे व अन्य महिला उपस्थित होत्या.