वंशाच्या दिव्यापुढे बेटी बचाव हरली, मुलींचा जन्मदर घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:22+5:302021-09-23T04:14:22+5:30
बॉक्स यावर्षी ७४८ मुले अधिक वंशाचा दिवा म्हणून पहिला मुलगाच हवा असा समज अनेकांमध्ये निर्माण झालेला आहे. मात्र, शासनाच्या ...
बॉक्स
यावर्षी ७४८ मुले अधिक
वंशाचा दिवा म्हणून पहिला मुलगाच हवा असा समज अनेकांमध्ये निर्माण झालेला आहे. मात्र, शासनाच्या विविध योजनांद्वारा मुलींचे समाजातील अनन्य साधारण महत्त्व लक्षा आणून दिल्यानंतर यावर्षी ३,०७९ मुलांचा व २३३१ मुलींचा जन्म झाला. यात ७४८ मुलांचे मुलींपेक्षा प्रमाण अधिक आहे.
--
लिंगनिदानास बंदी
स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रसूतीपूर्वी निदानतंत्र कायदा १९९४ लागू करण्यात आला आहे. या कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्येला काही प्रमाणात आळा बसला आहे.
कोट
प्रसूतीपूर्व लिंगनिदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण वाढावे, हा प्रशासनासह शासनाचा हेतू आहे. मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढण्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ कार्यक्रमातून जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे. सध्या मुला-मुलींच्या जन्मदरातील तफावत कमी झाली आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी
बॉक्स
हजार मुलांमागे मुली किती
सन मुले मुली
२०१७- ३८६० २२२७
२०१८- २८५६ २७०४
२०१९- ४७५७ ३७५३
२०२०- ४११७ ३२३९
२०२१- ३०७९ २३३१