२१ मार्चला दिवस-रात्र समान; सूर्य विषुववृत्तावर पोहोचत असल्याचा परिणाम

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 18, 2023 05:45 PM2023-03-18T17:45:30+5:302023-03-18T17:47:06+5:30

खगोल अभ्यासकांची माहिती

day and night are equal on 21 march; A result of the sun approaching the equator | २१ मार्चला दिवस-रात्र समान; सूर्य विषुववृत्तावर पोहोचत असल्याचा परिणाम

२१ मार्चला दिवस-रात्र समान; सूर्य विषुववृत्तावर पोहोचत असल्याचा परिणाम

googlenewsNext

अमरावती : सूर्य हा २१ मार्चला विषुववृत्तावर पोहोचत असल्याने या दिवशी संपूर्ण पृथ्वीवर दिवस व रात्र एकसमान राहणार आहे. या दिवसाला खगोलशास्त्रात विषुवदिन (इव्कीनॉक्स) व वसंतसंपात दिन असेही म्हणतात, असे खगोल अभ्यासकांनी सांगितले.

सरासरीनुसार हा दिवस २० ते २२ मार्च दरम्यान असतो, पृथ्वीच्या परांचल गतीमुळे या दिवसात दरवर्षाला थोडाफार फरक पडतो. या दिवशी उत्तर गोलार्धात वसंत ऋतूचा पहिला दिवस आणि दक्षिण गोलार्धात शरद ऋतूचा पहिला दिवस असतो. या दिवशी पृथ्वीचे दोन्ही ध्रुव अगदी सूर्यासमोर असतात. यावेळी विषुववृतावर मध्यान्हीच्या वेळी सूर्याचे किरण लंबरूप पडतात म्हणजेच मध्यान्हवेळी विषुववृत्तावर सूर्य बरोबर डोक्यावर असतो, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती विभाग अध्यक्ष प्रवीण गुल्हाणे व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली. खगोलप्रेमी व जिज्ञासूंनी या दिवसाचे अवलोकन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पृथ्वीच्या आसाच्या कलण्यामुळे घटना

दिवस व रात्र नेहमीच लहान-मोठी असतात. दिवस व रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलण्याने निर्माण होते. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो व दोन्ही गोलार्ध पृथ्वीपासून समान अंतरावर असतात, अशा दिवशी संपूर्ण पृथ्वीवर दिवस व रात्र समान राहत असल्याने खगोलतज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: day and night are equal on 21 march; A result of the sun approaching the equator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.