जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘डे केअर युनिट’ अव्वल

By admin | Published: November 27, 2015 12:21 AM2015-11-27T00:21:36+5:302015-11-27T00:21:36+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘डे केअर युनिट’ राज्यात अव्वल ठरले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या मूल्यांकनात ‘ड ेकेअर’ युनिटच्या यशस्वीतेवर ...

Day care unit of district general hospital tops | जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘डे केअर युनिट’ अव्वल

जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘डे केअर युनिट’ अव्वल

Next

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘डे केअर युनिट’ राज्यात अव्वल ठरले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या मूल्यांकनात ‘ड ेकेअर’ युनिटच्या यशस्वीतेवर उल्लेखनीय कामगिरी, असा शेरा मारण्यात आला आहे.
फेब्रुवारी २०१३ पासून अमरावतीच्या ‘डे केअर’ युनिटमधून आतापर्यंत तब्बल ६ अब्जाहून अधिक रुग्णांना निरामय आरोग्य मिळाले आहे. डे केअर युनिटमध्ये थॅऐसिमिया, हिमोफिलिया व सिकलसेल आजाराच्या रुग्णांना औषधोपचार, रक्तसंक्रमण, फिजिओथेरली आणि समुदपदेशन करण्यात येते. हिमोफिलिया, थॅलेसिमिया आणि सिकलसेल हे आजार दुर्धर असून या रुग्णांना तत्काळ औषधोपचार घ्यावा लागतो. येथील डेकेअर युनिटमध्ये विदर्भातील ११ जिल्हे नजीकच्या मुजरा आणि गुजरात आणि मध्यप्रदेशातून येथे रुग्ण येतात. थॅलेसिमिया तर महिन्याकाठी १५० रुग्णांवर उपचार करण्यात येतो. या युनिटमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तंत्र हा समुपदेशक आणि समन्वयकाच्या माध्यमातून काम चालते. उलेखनिय म्हणजे विदर्भात अमरावतीमध्ये असे डे केअर युनिट एकमेव आहे.

हिमोफिलिया - हिमोफिलिया हा आनुवंशिक आजार असून पालकांच्या जनुकांद्वारे ही विकृती मुलांमध्ये येते. पुरुषांना या आजाराची लक्षणे दिसून येतात. व स्त्रिया या आजाराच्या वाहक असतात. हिमोफिलिया आजारामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया सदोष असल्याने या आजारात जखम झाल्यावर अथवा दात काढल्यास रक्त वाहने बंद होत नाही. या आजाराच्या रुग्णांना रक्त गोठण्यासाठी उपयुक्त फॅक्टर देण्यात येते.
थॅलेसेमिया - थॅलेसेमिया हा अनुवंशिक रक्ताचा आजार असून यात हिमोग्लोबिन कमी होत जाते. कोणत्याही औषधाने व उपचाराने हा आजार पुर्णपणे बरा होत नाही. आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वधू- वराला लग्नापूर्वी थॅलेसेमिया मायनर तपासणिकरणे आवश्यक आहे.
सिकलसेल- सिकलसेल आजार हा आनुवंशिक असून यामध्ये लाल रक्तपेक्षा आपल्या गोल आकार बदलून कोयत्याच्या आकराच्या होतात. अवयवांना पुरेसा आॅक्सिजन न मिळाल्याने अवयव निकामी होतात. सांधे दुखतात. संसर्ग होतो. सिकलसेल आजारामध्ये आहे. आई, वडील दोघेही सिकलसेल ग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होवू शकतो.

Web Title: Day care unit of district general hospital tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.