कोर्टाच्या तारखेला हजर राहण्यास आलेल्या 'हिस्ट्रीशिटरचा' दिवसाढवळ्या खून 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 04:10 PM2019-11-25T16:10:18+5:302019-11-25T16:10:58+5:30

शेख हसन उर्फ हुसैन यांच्यासोबत सुभाष खुरखुरैया (६०, रा. विलासनगर) हा नोकर होता.

 Day-to-day murders of a 'historywriter' who appeared on a court date in amaravati | कोर्टाच्या तारखेला हजर राहण्यास आलेल्या 'हिस्ट्रीशिटरचा' दिवसाढवळ्या खून 

कोर्टाच्या तारखेला हजर राहण्यास आलेल्या 'हिस्ट्रीशिटरचा' दिवसाढवळ्या खून 

googlenewsNext

अमरावती : शहरातील वालकट कम्पाऊंड परिसरातील जाफरजीन प्लॉट येथे सोमवारी दुपारी १२.३० ते १२.४५ च्या सुमारास एका ४७ वर्षीय हिस्ट्रीशिटरचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शेख हसन शेख हुसैन ऊर्फ नानिका हसन (रा. आझादनगर) असे मृताचे नाव आहे. न्यायालयातील एका प्रकरणात तारखेसाठी उपस्थित राहून तो दुचाकीने वालकट मार्गे घराकडे निघाला होता. त्यावेळी, हा हल्ला करुन खून करण्यात आला. 

शेख हसन उर्फ हुसैन यांच्यासोबत सुभाष खुरखुरैया (६०, रा. विलासनगर) हा नोकर होता. जाफरजीन प्लॉट येथे दुचाकी व ऑटोरिक्षाने आलेल्या पाच जणांनी प्रथम दुचाकी चालवित असलेल्या नानिका हसनच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. बेसावध असतानाच त्याच्या तोंडावर, मानेवर धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून कोतवाली पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नानिका हसनला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यादरम्यान रुग्णालय परिसरात विशिष्ट समुदायाचा मोठा जमाव जमला होता. 
नानिका हसन हा गुन्हेगारी विश्वात सक्रिय होता. गांजा तस्करी, जुगार तसेच ४० ते ४५ गुन्हे त्याच्यावर नोंदविले गेले आहेत. पोलिसांच्या चार पथकांनी शोधकार्य राबवून पाचही आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्या हत्येचे तार काही वर्षांपूर्वी शहरात घडलेले सल्लू हत्याप्रकरणाशी जुळले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता.
 

Web Title:  Day-to-day murders of a 'historywriter' who appeared on a court date in amaravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.