उघड्यावरील डीबी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:13 AM2021-03-28T04:13:05+5:302021-03-28T04:13:05+5:30
पान ३ साठी कावली वसाड : धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत असलेल्या डीबीमधून फ्यूज तार उघडी असल्याने शेतकऱ्यांच्या ...
पान ३ साठी
कावली वसाड : धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत असलेल्या डीबीमधून फ्यूज तार उघडी असल्याने शेतकऱ्यांच्या जीवासा धोका निर्माण झाला आहे. परिसरात बहुतांश ठिकाणचे रोहित्र आणि त्यातील फ्यूज सतत उघडे असल्याने कधी काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे याकडे संबंधित विभाग लक्ष कधी देतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सिंचन क्षेत्र वाढल्याने उन्हाळी भुईमूग, मूग, तीळ व संत्र्याच्या बागांना सिंचन करावे लागते. अनेक ठिकाणच्या डीबी तुटलेल्या अवस्थेत असल्याने वीज वितरण कंपनीला प्राणांतिक अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. रोहित्र उघडे असल्याने वन्यप्राणी किंवा मोकाट जनावरांनी स्पर्श करून गेल्याने अनेकदा शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित होतो.
-----------------