डीसीपी निवा जैन यांना शौर्यपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:21 AM2018-08-20T01:21:11+5:302018-08-20T01:22:22+5:30
पोलीस ठाण्यावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करणाºया नवनियुक्त डिसीपी निवा जैन यांना केंद्र शासनाने शौर्यपदकाने सन्मामिन केले. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे पोलीस अधीक्षकपदावर असताना ही धाडसी कामगिरी बजावली होती.
अमरावती : पोलीस ठाण्यावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करणाºया नवनियुक्त डिसीपी निवा जैन यांना केंद्र शासनाने शौर्यपदकाने सन्मामिन केले. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे पोलीस अधीक्षकपदावर असताना ही धाडसी कामगिरी बजावली होती.
कठुआ येथील राजबाग पोलीस ठाण्यावर २५ मार्च २०१५ रोजी दहशतवाद्यांनी हल्ला चढविला होता. त्यावेळी पोलीस व दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. ती स्थिती हाताळताना निवा जैन यांनी धाडसी वृत्तीने दहशतवाद्यांना चोख प्रतिउत्तर दिले. पोलीस व सामान्यांची जाणीव ठेऊन त्यांनी जीवतहानी होऊ न देता दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. याची दखल घेत केंद्र शासनाने पोलिस मेडल फॉर गॅलन्ट्री अवॉर्ड (शौर्यपदक) जाहीर केले. राज्यपालांच्या हस्ते जैन यांना लवकरच हा पुरस्कार दिला जाणार आहे.
निवा जैन यांना महाराष्ट्रात पहिलीच नियुक्ती अमरावती येथे मिळाली आहे. त्यांचा आदर्श अमरावती पोलिसांना कणखर करेल, अशी अपेक्षा अधिकारी, कर्मचाºयांकडून व्यक्त होत आहे.