इर्विनमधील स्वच्छतागृहात आढळले मृत अर्भक; सिटी कोतवाली पोलिस करत आहेत तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:05 PM2024-08-27T12:05:44+5:302024-08-27T12:06:31+5:30
Amravati : 'ती' आली, चिठ्ठी काढली अन् अर्भक टाकून गेली
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतागृहात रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एक नवजात अर्भक मृत आढळल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयात एक गर्भवती महिला ७ वाजता भरती झाली होती. तिच्यासोबत दोन महिला व एक पुरुष देखील होता. काही वेळाने हे चौघेही दिव्यांग ओपीडी विभागाजवळ असलेल्या स्वच्छतागृहात गेले; परंतु त्यानंतर ते चौघेही रुग्णालयातून पसार झाले. स्वच्छतागृहात अर्भक आढळून येताच याची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना देण्यात आली असून, ते या घटनेचा तपास करत आहेत.
रविवारी रुग्णालयातील ओपीडी बंद होती; परंतु इमर्जन्सी अपघात कक्ष मात्र सुरू होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास २१ वर्षीय गर्भवती तरुणी ही तेथे दाखल झाली होती. रविवारी रुग्णालयातील ओपीडी बंद होती; परंतु इमर्जन्सी अपघात कक्ष मात्र सुरू होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास २१ वर्षीय गर्भवती तरुणी ही तेथे दाखल झाली होती. रुग्णालयातून बाहेर गेले. काही वेळाने या स्वच्छतागृहात एक व्यक्ती गेला असता त्याला शौचालयाच्या सीटवर डोके आत असलेला अर्भक आढळून आला. मृत अर्भक बाहेर काढून रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आले.
"रविवारी रात्री इर्विनच्या स्वच्छतागृहामध्ये मृत अर्भक आढळले. त्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज जप्त करण्यात आले. ते तपासले जात आहे. इर्विन व डफरिन प्रशासनाला प्रसुतीसाठी आलेल्या गर्भवती महिलांची माहिती मागितली आहे."
- मनोहर कोटनाके, ठाणेदार, सिटी कोतवाली
"रविवारी रात्री स्वच्छतागृहामध्ये अर्भक आढळून आले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. तसेच त्यांना अपघात कक्षाजवळील सीसीटीव्ही फुटेजही देण्यात आले आहेत. त्यामुळे या घटनेचा पुढील तपास पोलिस प्रशासन करत आहे."
- डॉ. प्रीती मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन