मृत माकड पालिकेच्या आरोग्य विभागात आणून टाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:18+5:302021-03-06T04:13:18+5:30
फोटो पी ०५ परतवाडा माकड परतवाडा : अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात गुरुवारी मृत पावलेल्या माकडाला उचलून नेण्याची विनंती ...
फोटो पी ०५ परतवाडा माकड
परतवाडा : अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात गुरुवारी मृत पावलेल्या माकडाला उचलून नेण्याची विनंती करूनही नगरपालिकेतर्फे कुठलीच कारवाई न झाल्याने संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ते मृत माकडच स्वच्छता व आरोग्य विभागाच्या कार्यालयात आणून टाकले.
अचलपूर मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात एक माकड मृतावस्थेत असल्याचे मनसेचे रुपेश शर्मा यांना दिसून आले. त्यांनी यासंदर्भात अचलपूर नगरपालिकेच्या वाॅर्ड जमादार, स्वच्छता व आरोग्य विभाग यांना माहिती दिली. परंतु पालिकेच्यावतीने दुसऱ्या दिवशीदेखील दखल घेतली नसल्याचा आरोप मनसेचे शहर उपाध्यक्ष रुपेश शर्मा यांनी केला. त्यामुळे पालिकेच्या या कार्यप्रणालीवर संतप्त होत त्यांनी शुक्रवारी दुपारी मृत माकडाला पोत्यात भरून पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागात आणून टाकले. हा प्रकार पाहता पालिकेत काही वेळासाठी खळबळ उडाली. काही वेळानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मृत माकडाचा अंत्यविधी केला.
कोट
संबंधितांनी केवळ एक तासभर आधी फोनवर माहिती दिली. त्यासंदर्भात कारवाई करीत असताना अचानक आरोग्य विभागात मृत माकड आणून टाकले. त्यानंतर कर्मचाºयांकडून अंत्यविधी करण्यात आला.
- मिलिंद वानखडे,
स्वच्छता व आरोग्य निरीक्षक
अचलपूर पालिका
----------