हॉकर्स सर्वेक्षणासाठी १० जानेवारी ‘डेडलाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:00 AM2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:25+5:30

ज्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले आहे आणि कागदपत्रे जमा करणे बाकी आहे, अशा फेरीवाल्यांनी आपली सर्व कागदपत्रे ३१ डिसेंबरपर्यंत जमा करणे अनिवार्य आहे. हॉकर्स झोन व फेरीवाला सर्र्वेेेक्षणाबाबत आयुक्त संजय निपाणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आली. त्यामध्ये आयुक्तांनीे सदर निर्देश दिले.

Deadline for Hawkers survey January 10 | हॉकर्स सर्वेक्षणासाठी १० जानेवारी ‘डेडलाइन’

हॉकर्स सर्वेक्षणासाठी १० जानेवारी ‘डेडलाइन’

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांची तंबी : १६३७ फेरीवाल्यांची कागदपत्रे जमा नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ज्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले आहे आणि कागदपत्रे जमा करणे बाकी आहे, अशा फेरीवाल्यांनी आपली सर्व कागदपत्रे ३१ डिसेंबरपर्यंत जमा करणे अनिवार्य आहे. हॉकर्स झोन व फेरीवाला सर्र्वेेेक्षणाबाबत आयुक्त संजय निपाणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आली. त्यामध्ये आयुक्तांनीे सदर निर्देश दिले.
ज्या पथविक्रेता/फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झालेले नाही, त्यांनी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालयात ३१ डिसेंबरपर्यंत पथविक्रेता नोंदणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीत उपआयुक्त सुरेश पाटील, शहर प्रकल्प अधिकारी नरेंद्र वानखडे, सहायक संचालक नगर रचना आशिष उईके, शहर अभियंता रवींद्र पवार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, एन.यू.एल.एम. व्यवस्थापक भूषण बाळे, प्रफुल्ल ठाकरे, उदय चव्हाण, आनंद काशीकर, अमर सिरवानी तसेच फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी, सर्वेक्षण किंवा कागदपत्रे जमा करणारे फेरीवाले यांचे सर्वेक्षण १० जानेवारीपर्यंत करण्यात येईल तसेच प्रारूप यादी १३ जानेवारीला सर्व झोननिहाय, मुख्य कार्यालयांच्या वेबसाइटवर व सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही पथविक्रेता/फेरीवाला याची नोंदणी, सर्वेक्षण किंवा कागदपत्रे जमा करता येणार नाही, असे या बैठकीत ठरविण्यात आले.
केंद्र शासनाच्या पथविक्रेता उपजीविका संरक्षण व विक्री विनिमय अधिनियम (१) ३६ मधील कलम २०१४ अनुसार राज्य शासनाने पथविक्रेता ३८ तसेच कलम २०१६ महाराष्ट्र नियम उपजीविका संरक्षण व विक्री विनिमय अनुसार पथविक्रेता योजना २०१७ मंजूर केलेली आहे. महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या परवानाधारक/विना परवाना फेरीवाला व्यावसायिकांनी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर) स्वत:च्या आधार कार्ड$ क्रमांकाशी संलग्न (लिंक) करून घेणे आवश्यक आहे.

मोबाइल अ‍ॅपद्वारे
बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण
आधार कार्डाची प्रत, रेशन कार्ड प्रत, महाराष्ट्रातील अधिवास असल्याचे सक्षम प्राधिकरणाकडील अधिवास प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास त्याबाबतचे (अपंग) प्रमाणपत्र, विधवा एकल महिला असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, परित्यक्ता/अनुसूचित जाती-जमाती या गटात समावेश असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, बँक पासबूकची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्राच्या प्रती मोबाइल अ‍ॅपद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण होत असताना जवळ तयार ठेवाव्यात, असे आवाहन अमरावती महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांना करण्यात येत आहे.

बसस्टॉपजवळ मनाई
समाजकल्याण विभागाकडून शहरात विविध ठिकाणी स्टॉल देण्यात आले आहेत. सदर स्टॉल ज्या ठिकाणी परवानगी दिली, त्या ठिकाणी नसल्यास जप्त करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. बस स्टॉपजवळ हॉकर राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. अनधिकृत प्लास्टिकचा वापर करणाºया हॉकरवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दरमहा यासंदर्भात बैठक घेण्याचे सूचित करण्यात आले.

ठाणे येथील संस्थेकडे सर्वेक्षण
अमरावती महापालिका क्षेत्रात व्यवसाय करणाºया पथविक्रेता/फेरीवाल्यांचे मोबाइल अ‍ॅपद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्याचे काम सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित (ठाणे) या बाह्य संसाधन संस्थेकडून मे २०१९ पासून करण्यात येत आहे. शहरातील ३०३२ पथविक्रेता /फेरीवाला यांचे सर्वेक्षण झाले आहे. त्यापैकी १६३७ पथविक्रेता/ फेरीवाल्यांनी त्यांची अद्ययावत कागदपत्रे जमा केलेली नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: Deadline for Hawkers survey January 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार