नगराध्यक्षांच्या मुदतवाढीचा संभ्रम
By Admin | Published: June 9, 2014 11:20 PM2014-06-09T23:20:41+5:302014-06-09T23:20:41+5:30
जिल्ह्यातील ९ नगरपरिषद अध्यक्षांचा कार्यकाळ २८ जून २0१४ रोजीसंपत असल्याने जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी निवडणुकीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव स्वाक्षरीसाठी जिल्हाधिकार्यांसमोर सादर करण्यात
गजानन मोहोड - अमरावती
जिल्ह्यातील ९ नगरपरिषद अध्यक्षांचा कार्यकाळ २८ जून २0१४ रोजीसंपत असल्याने जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी निवडणुकीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव स्वाक्षरीसाठी जिल्हाधिकार्यांसमोर सादर करण्यात आला आहे. दरम्यान आचारसंहितेमुळे विकास कामे होऊ शकली नसल्याने मुदतवाढीची मागणी नगराध्यक्षांनी केली आहे. मुदतवाढीचा प्रस्ताव तूर्तास मुख्यमंत्र्यांच्या दालनात आहे.
मुदतवाढ की निवडणूक या विषयीचा निर्णय न झाल्याने संभ्रम कायम आहे. मंगळवार १0 जूनला हा तिढा सुटण्याची शक्यता दिसून येत आहे.
राज्यामधील नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ २६, २७ व २८ जूनला संपत आहे. या पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनातील नगरप्रशासन विभागाने तयारी सुरू केली आहे.
निवडणुकीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून जिल्हाधिकार्यांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत आहेत. या नगराध्यक्षांना मुदतवाढ मिळाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात शासनाचे या संदर्भात कुठलेच आदेश नसल्याचे अमरावती जिल्हा नगरप्रशासन अधिकारी तडवी यांनी सांगितले. जिल्ह्यात चार महिने लोकसभेची आचारसंहिता होती, हे येथे विशेष.