डीलर, डिलिव्हर ‘ट्रॅप’; ३०० ग्रॅम एमडी जप्त, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 03:25 PM2023-03-03T15:25:16+5:302023-03-03T15:26:15+5:30

मुंबईतील म्होरक्यासह लोकल कनेक्शनही उघड, मोठी कारवाई

dealer, deliver trapped, 300 grams of MD seized, three arrested in amravati | डीलर, डिलिव्हर ‘ट्रॅप’; ३०० ग्रॅम एमडी जप्त, तिघांना अटक

डीलर, डिलिव्हर ‘ट्रॅप’; ३०० ग्रॅम एमडी जप्त, तिघांना अटक

googlenewsNext

अमरावती : शहर पोलिसांनी तिघांकडून तब्बल ३०० ग्रॅम मेफेड्रॉन ‘एमडी’ हा मादक पदार्थ जप्त केला. यात डीलर, डिलिव्हर व अन्य एक अशा एकूण तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. आरोपी त्रिकुटाकडून जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत सुमारे १२ लाखांच्या घरात आहे. पोलिस उपायुक्त सागर पाटील व सहायक पोलिस आयुक्त प्रशांत राजे यांनी गुरुवारी दुपारी या कारवाईबाबत माहिती दिली. शहर गुन्हे शाखेने ही यशस्वी कारवाई केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स पकडण्याची शहर पोलिसांची ही अलीकडची सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.

नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका हॉटेलजवळ एमडीची डील होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे व त्यांच्या टीमने २ मार्च रोजी पहाटे ट्रॅप रचला. तेथून एमडीची डील करण्यासाठी आलेल्या खालिदोद्दीन झामिरोद्दीन (३२, रा. माना, ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला), अशफाक अशरफ शेख उम्र (३१, रूम नंबर १८१, घास बाजार गेट नंबर १८, नौपाडा, बांद्रा ईस्ट, मुंबई) व शोएब अहमद शेख हसन (२६, रा. चांदनी चौक, हाथीपुरा) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ३०० ग्रॅम एमडी व मोबाइल असा एकूण १२.९२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलिस आयुक्तांनी दिले होतेे निर्देश

पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरामध्ये होणाऱ्या एमडीच्या विक्रीच्या अनुषंगाने पुरवठादारांवर कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिले होते. त्याबाबत त्यांनी गुन्हे शाखेला मार्गदर्शनदेखील केले होते. एमडी शहरात कुठून येते, त्याचा सप्लायर कोण, स्थानिक डिलिव्हर कोण, ही माहिती काढण्यासाठी सायबर सेलचे एपीआय रवींद्र सहारे यांची तांत्रिक मदत घेण्यात आली. पक्की माहिती हाती येताच ट्रॅप यशस्वी करण्यात आला.

यांनी केली कारवाई

पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा प्रमुख अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, अंमलदार राजुअप्पा बाहेणकर, सतीश देशमुख, अजय मिश्रा, सूरज चव्हाण, निवृती काकड, सुधीर गुडधे, अमोल बहाद्दरपुरे यांनी ही कार्यवाही केली आहे.

Web Title: dealer, deliver trapped, 300 grams of MD seized, three arrested in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.