चौथ्या मजल्यावरून पडून व्यावसायिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:48 PM2018-05-19T22:48:56+5:302018-05-19T22:49:19+5:30

जेवण आटोपून छतावर फिरताना एका युवा व्यापाऱ्याचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास सातुर्णा ते साईनगरदरम्यान श्रद्धा श्री अर्पाटेमेंटमध्ये ही घटना घडली. अनूज वसंत आडतीया (३७) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

The death of the businessman fell down from the fourth floor | चौथ्या मजल्यावरून पडून व्यावसायिकाचा मृत्यू

चौथ्या मजल्यावरून पडून व्यावसायिकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देशहरात खळबळ : सातुर्णा परिसरातील श्रद्धाश्री अपार्टमेंटमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जेवण आटोपून छतावर फिरताना एका युवा व्यापाऱ्याचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास सातुर्णा ते साईनगरदरम्यान श्रद्धा श्री अर्पाटेमेंटमध्ये ही घटना घडली. अनूज वसंत आडतीया (३७) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
युवा व्यावसायी अनूज आडतीया यांचे जयस्तंभ चौकात राजकोट मिठाईवाला नावाने व्यापारी प्रतिष्ठान आहे. शुक्रवारी रात्री दुकान करून अनूज त्यांच्या काकासोबत घरी गेले. त्यांचे श्रद्धाश्री अपार्टमेंटच्या तिसºया मजल्यावर फ्लॅट आहे. कुटुंबीयांसोबत रात्री जेवण करून अनूज, त्यांची आणि १० वर्षीय मुलीसह चौथ्या मजल्यावरील छतावर फिरण्यास गेले. चर्चा करीत सरंक्षण भिंतीवर बसले होते. रात्रीची १२.३० ते १ ची वेळ असताना अनूज यांना झपकी येताच त्यांचे संतुलन बिघडले आणि ते खाली कोसळले. त्यांच्या मुलीने चौकीदार सतीश नाथेला माहिती दिली. अनुजला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. याशिवाय आयपीएल सट्ट्यामुळे अनुपने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा सर्वत्र आहे.
मरणोपरांत नेत्रदान
अनूजच्या मृत्यूमुळे आडतीया कुटुंबीयांवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. आडतीया कुटुंबीयांनी मानवतेचे परिचय देऊन अनुजचे मरणोप्रांत नेत्रदानाचा निर्णय घेतला. शनिवारी पहाटे ५ वाजता अनुजच्या नेत्रदानाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. हरिना नेत्रदान समिती व जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. कुणाल वानखडे, निलेश भेंगडे, रामप्रकाश गिल्डा, शरद कासट, प्रणित सोनी, चंद्रकांत पोपट व मनोज राठी यांनी नेत्रदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेतला.

चौथ्या मजल्याच्या भिंतीवर बसले असताना तोल जाऊन खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ

Web Title: The death of the businessman fell down from the fourth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.