मरण झाले स्वस्त, विषाणू महामारीत कोरोनानंतर अपघातात घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:10 AM2021-06-28T04:10:30+5:302021-06-28T04:10:30+5:30
अमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. मार्च ते ३१ मे दरम्यान लॉकडऊनमुळे रस्त्यावरील अपघाताने मृत्यूच्या ...
अमरावती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. मार्च ते ३१ मे दरम्यान लॉकडऊनमुळे रस्त्यावरील अपघाताने मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते. गत पाच महिन्यात १५१ अपघात झाले असून, ३८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाहतुकीचे प्रमाण शहरात वाढल्याने पुन्हा अपघात वाढून मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर खासगी वाहने चालविण्यास परवानगी मिळाली. अनलॉकच्या प्रारंभी रस्ते मोकळे असल्याने व वाहतूक अचानक वाढल्याने नागरिकांनी निष्काळजीपणे अतिवेगाने वाहने दामटली. वाहन चालविण्याचे पॅटर्नमध्ये अचानक झालेले बदल अपघात वाढीस कारणीभूत ठरल्याचे पोलिसांनी सांगितले. विनापरवाना तीन वाहन पडून असल्याने त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष झाले. अवजड वाहने चालविणाऱ्या कष्टकरी वर्गाकडे लॉकडाऊन काळात कामे नसल्याने पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनाही वाहनांची दुरुस्ती करता आली नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे काही अपघात महामार्गावर घडले आहेत. काही ठिकाणी खड्डे वाचविण्याच्या नादात रस्त्यावर अपघात घडड्याची नोंद आहे.
गत पाच महिन्यात शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५१ वाहन अपघात झाले. त्यात ११६ जण जखमी झाले. ३८ जणांना आपला जीव गमावावा लागला. मात्र, गतवर्षीच्या पाच महिन्याच्या तुलनेत लॉकडाऊनमुळे यंदा अपघातात घट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
वर्ष अपघात जखमी मृत्यू
२०१८ ४५३ ३७६ ९०
२०१९ ४६५ ३१४ ९२
२०२० ३८५ २७४ ८१
२०२१ १५१ ११६ ३८
मे पर्यंत
बॉक्स:
लॉकडाऊनमध्ये अपघात घटले
लॉकडाऊन निर्बंध असल्याने अपघाती मृत्यूच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. गतवर्षीच्या लॉकडाऊन काळातही अनेक गंभीर अपघातात काहींना प्राणाला मुकावे लागले. सन २०२१ मध्ये पाच महिन्यात अमरावती शहरात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, १५१ अपघातात ११६ जण जखमी झाले. ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
बॉक्स
पायी चालणाऱ्यांनाही धोका
रस्त्याने पायदळ जाणाऱ्यांचेही अपघात झाल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी शेतातून काम अटोपून घरी जाणाऱ्या शेतकऱ्याला मागून वाहनचालकांनी धडक दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शहरात अनेक रस्त्यावर अतिक्रमित हातगाड्यांमुळे रस्ते व्यापले आहेत. अवैध वाहनेसुद्धा रस्त्यावर पार्किंग केली जातात. त्यामुळेसुद्धा पादचाऱ्यांना फुटपाथऐवजी रस्त्यांवरून चालवावे लागते. त्यामुळेसुद्धा धोका निर्माण झालेला आहे.
बॉक्स
मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश
शहरात झालेल्या अनेक अपघातामध्ये तरुणांना जीव गमावावा लागला. भरधाव वेगाने वाहन चालविणे, मुद्दधुंद अवस्थेत दुचाकी पळविणे, स्वत:च अपघात करून मरणास कारणीभुत ठरणे आदी अनेक प्रकणांमध्ये सर्वाधिक तरुण मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.
बॉक्स:
या ठिकाणी वाहने हळू चालवा
शहरात सर्वत्र सिमेंटचे गुळगुळीत रस्ते तयार झाले असून अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघातांच्या प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे. शहरात अनेक ठिकाणी ब्लॅकस्पॉट आहेत त्या ठिकाणी वाहने हळू चालवावी दारु पिऊन वाहने चालवून नये, आपला व आपल्या परिवारातील सदस्यांच्या जीव धोक्यात टाकू नये.
कोट
नागरिकांनी वाहतुकीचे नियंम पाळावे. शहरातून भरधाव वेगाने वाहन चालविण टाळावे. आमचे शहरात वर्षभर कारवाया सुरुच असतात. वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, सर्वांनी वाहतूक नियम पाळले तर अपघात टळू शकते.
- प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा