अज्ञात इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:51+5:302021-07-02T04:09:51+5:30
------------ घराबाहेर बोलावून चाकूने वार अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थनगर येथे एका व्यक्तीला तिघांनी हाॅर्न वाजून घराबाहेर ...
------------
घराबाहेर बोलावून चाकूने वार
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थनगर येथे एका व्यक्तीला तिघांनी हाॅर्न वाजून घराबाहेर येण्याची सूचना केली. तो बाहेर येताच पोटावर व दंडावर चाकूने मारून जखमी केले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून २८ वर्षीय महिला (रा. इतवारा बाजार) गुन्हा नोंदवून अटक केली. तिचे दोन सहकारी पसार आहेत. २८ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.
--------------
मनोरुग्ण मुलगी गाडगेनगरातून बेपत्ता
अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडीएमसीमध्ये मानसिक आजारावरील उपचाराकरिता आईसमवेत आलेली १७ वर्षीय मुलगी तेथून बाहेर पडल्यानंतर अचानक बेपत्ता झाली. २८ जून रोजी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.