जिवंत वीज तारेच्या स्पर्शाने मेंढ्यांचा मृत्यू
By admin | Published: June 2, 2017 12:11 AM2017-06-02T00:11:48+5:302017-06-02T00:11:48+5:30
शेतात पडलेला जिवंत वीज तारेच्या स्पर्शाने तीन मेंढ्या दगावल्याची घटना बुधवार ३१ मे रोजी रात्री ७ वाजता तिवसा बसस्थानक परिसरात घडली.
तिवसा : शेतात पडलेला जिवंत वीज तारेच्या स्पर्शाने तीन मेंढ्या दगावल्याची घटना बुधवार ३१ मे रोजी रात्री ७ वाजता तिवसा बसस्थानक परिसरात घडली. प्राप्त माहितीनुसार, साहेबराव पिराजी कोरटकर (रा. पुसदा) हे आपल्या मालकीच्या मेंढ्या चराईवरून वापस आणत असताना वादळी वाऱ्याने विद्युतवाहित तार तुटून जमिनीवर पडली व या तारेच्या स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैव्याने मोठा अनर्थ टळला. मात्र तीन मेंढ्या यात दगावल्याने कोरटकर यांचे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी तिवसा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली आहे. नुकसान भरपाईची मागणी केली आहे. वीज वितरण कंपनीच्या बेपर्वाईमुळेच घटना घडल्याचा आरोप कोरटकर यांनी केला आहे.