विष प्राशनाने नवविवाहितेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:16 AM2021-09-12T04:16:54+5:302021-09-12T04:16:54+5:30
तक्रारीनुसार, सुनील धोटे यांची मुलगी मनीषाचा विवाह पंकज रमेश भिसे याच्याशी १३ जुलै रोजी झाला होता. वडिलांनी जावयाला सोन्याची ...
तक्रारीनुसार, सुनील धोटे यांची मुलगी मनीषाचा विवाह पंकज रमेश भिसे याच्याशी १३ जुलै रोजी झाला होता. वडिलांनी जावयाला सोन्याची अंगठी, गोफ, कपडे व सर्व प्रकारच्या भेटवस्तू दिल्या तसेच मनीषालाही सोन्याचा गोफ व नेकलेस भेट दिला. लग्नानंतर संसाराची स्वप्ने रंगवित असलेल्या मनीषाला पंकज हा दसऱ्याला तुझ्या वडिलांकडून सोन्याचे पान भेट म्हणून हवे, असे वारंवार सांगत होता. त्यासाठी तो मनीषाचा मानसिक छळ करीत होता. ७ सप्टेंबर रोजी मनीषाला विषारी औषध देऊन सासरकडील मंडळींनी आष्टीऐवजी तिला मृतावस्थेत वरूड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित करताच त्यांनी पलायन केले. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका वडिलांनी घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अवघ्या दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत माझ्या मुलीला विषारी औषध पाजून जिवंत मारले असल्याची तक्रार मनीषाच्या वडिलांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी कलम ३०४ (ब) नुसार गुन्हा दाखल केला असला तरी आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.