दोन सख्ख्या चुलत बहिणीचा एकाच वेळी मृत्यू, अन्नातून विषबाधाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 10:16 AM2024-07-05T10:16:49+5:302024-07-05T10:18:15+5:30

नंदिनी प्रवीण साव १० वर्ष, चैताली राजेश साव व ११ वर्ष अशा मृत्यू झालेल्या दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचे नाव आहे.

Death of two full cousins at the same time, possibility of food poisoning | दोन सख्ख्या चुलत बहिणीचा एकाच वेळी मृत्यू, अन्नातून विषबाधाची शक्यता

दोन सख्ख्या चुलत बहिणीचा एकाच वेळी मृत्यू, अन्नातून विषबाधाची शक्यता

मोहन राऊत

धामणगाव - मुलींवर खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार केला प्रकृती ठीक असल्याने रात्रीला घरी आणले मात्र पहाटे दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचा एका दहा मिनिट फरकाने मृत्यू झाल्याने संपूर्ण  वीरूळ रोंघे गाव हळहळले आहे. आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन या घटनेमागील शोध घेत आहे. याच दरम्यान अन्नातून झालेल्या विषबाधामुळे हा प्रकार घडली असावी असा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे.

नंदिनी प्रवीण साव १० वर्ष, चैताली राजेश साव व ११ वर्ष अशा मृत्यू झालेल्या दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचे नाव आहे. चैताली ही गावातील माधवराव वानखडे विद्यालयात इयत्ता पाचवी शिक्षण घेत होती तर नंदिनी प्राथमिक मराठी जि. प. शाळेत इयत्ता चौथा वर्गात होती नंदिनी काल गुरुवारी शाळेत गेली नाही तर चैताली ही नेहमीप्रमाणे सकाळ सत्रात असलेल्या शाळेत गेली होती. दुपारी दोघी सख्ख्या चुलत बहिणी एकत्र खेळल्या मात्र अचानकपणे दोघींनाही पोटात दुखणे, ताप व हगवण लागल्याने धामणगाव रेल्वे येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दोघीची प्रकृती ठीक असल्याने त्यांना घरी नेण्यात आली. मात्र अचानक रात्रीला दोघींची  प्रकृती बिघडली व पहाटे नंदिनी व चैताली यांच्या अवघ्या दहा मिनिटाच्या फरकाने मृत्यू झाला.

दोन सख्ख्या बहीण भावावर केलेले उपचार
मृतक नंदिनीची मोठी बहीण भक्ती  वय १३ वर्ष व मृतक चैतालीचा लहान भाऊ देवांश  वय ३ वर्ष यांना रात्रीला पोटात दुखू लागल्याने दोघांनाही शुक्रवारी पहाटे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली.

विषबाधा झाल्याचा आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज
विरूळ रोंघे  गावात एकाच घरा शेजारी  राहणाऱ्या साव कुटुंबातील  दोन्ही मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते असा प्राथमिक अंदाज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य विभागाने येथे तपासणी शिबिर लावण्यात आले आहे.  मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रा. प सदस्य मंगेश गुल्हाने यांनी केली आहे दरम्यान महसूल, पोलिस, आरोग्य प्रशासन  घटनास्थळी दाखल झाले आहे. दोन्ही मुलीचां मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शव विच्छेदानंतर उलगडा होणार आहे.

संपूर्ण गाव हळहळले 
शेत मजुरीचे काम करणाऱ्या साव कुटुंबातील नंदिनी व चैताली या दोन्ही मुली जेवढ्या शांत तेवढ्या हुशार होत्या याच वर्षी चैताली ही पाचव्या वर्गात प्रवेश घेतला होता. तर नंदिनी ही चौथ्या वर्गात शिकत होती सख्या चुलत बहिणीचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळले आहे.

Web Title: Death of two full cousins at the same time, possibility of food poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.