एसटीच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू, दोन एसटींची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:58 PM2018-02-12T22:58:20+5:302018-02-12T22:59:17+5:30

येथील विश्रामगृहासमोरील वळणावर एसटीच्या धडके त एका १३ वर्षीय सायकलस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त जमावाने दगडफेक करीत दोन बसेस पेटविल्या.

The death of the student in ST, the arson of two STs | एसटीच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू, दोन एसटींची जाळपोळ

एसटीच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू, दोन एसटींची जाळपोळ

Next
ठळक मुद्देअग्निशमन वाहन फोडले : संतप्त जमावाची दगडफेक, पाच जण जखमी, कर्फ्युसदृश स्थिती

आॅनलाईन लोकमत
वरुड : येथील विश्रामगृहासमोरील वळणावर एसटीच्या धडके त एका १३ वर्षीय सायकलस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त जमावाने दगडफेक करीत दोन बसेस पेटविल्या. यात पाच जण जखमी झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आलेल्या अग्निशमन वाहनाची तोडफोट करण्यात आली.
जमावाला शांत करण्यासाठी आलेल्या तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकाºयांनादेखील धक्काबुुक्की करण्यात आली. शहरात तणाव वाढल्याने दुकाने बंद करण्यात आली. दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आल्यावर त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मोठी हानी होऊ नये, यासाठी एसटी आगारातून बसेस इतरत्र हलविण्यात आल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. वृत्त लिहिस्तोवर वरूड शहरात कर्फ्युसदृश स्थिती होती. पोलीस तपास सुरू होता.
मोहंमद ताबीज मोहमंद फिरोज (१३ रा. इस्लामनगर, वरूड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो घटनास्थळानजीकच्या शांतिनिकेतन स्कूलचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी होता. सकाळी १२ वाजताच्या सुमारास सायकलने शाळेत जात असताना तावीजला स्थानिक विश्रामगृहानजीक अमरावतीकडे जाणाºया एमएच ४० एन ८४९० या बसची धडक लागली. बसचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. घटनेनंतर नागरिकांची गर्दी झाली. एसटी चालकाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत असतानाच जमावातून दगडफेक सुरू झाली. काहींनी बस जाळली. यात याच भागातून अमरावतीकडे जाणारी एमएच ४० एच ८४५२ या एसटीलाही नागरिकांनी आग लावली. जमाव अनियंत्रित झाल्याने दुकानांवरही दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी बसचालक अब्दूल रफिक अब्दूल रऊफ (५६,रा.पुसला) यास अटक केली. पोलीस तपास करीत आहे.
अधिकाऱ्यांना धक्काबुक्की
जमावाच्या असंतोषावर नियंत्रण मिळविण्यासाठी तहसीलदार आशिष बिजवल, उपविभागीय अधिकारी दिलदार तळवी, ठाणेदार गोरख दिवे, शेंदूरजनाघाटचे ठाणेदार शेषराव नितनवरे, बेनोड्याचे ठाणेदार शांतीकुमार पाटील हे पोलीस दलासह दाखल झाले. त्यांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली. तीन तास शहरातील वाहतूक पूर्णत: खोळंबली होती. दंगानियंत्रक पथक वरूड शहरात गस्त घालीत आहे.
अग्निशमन वाहन फोडले
पेटलेल्या एसटी बसेसना विझविण्याकरिता वरूड नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन आल्यावर त्यावरही दगडफेक केली. यात त्याचे नुकसान झाले. नजीकच्या शेंदूरजनाघाट नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. शहरातील शाळांना सुटी देण्यात आली. दुाकनेसुद्धा बंद करण्यात आली. आग विझविताना प्रभाकर काळे, मुकीमसह पाच जण दगडफेकीत जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्रकाराचे मोबाईल व कॅमेरे हिसकाविण्याचा प्रकरही घडला.

Web Title: The death of the student in ST, the arson of two STs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.