मेळघाटातील ‘त्या’ वाघाचा मृत्यू पाच दिवसांपूर्वीचा; अहवालात स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 02:51 AM2021-01-25T02:51:22+5:302021-01-25T02:51:39+5:30

अमरावती, हैदराबादला पाठविले सॅम्पल

The death of 'that' tiger in Melghat five days ago; Clear in the report | मेळघाटातील ‘त्या’ वाघाचा मृत्यू पाच दिवसांपूर्वीचा; अहवालात स्पष्ट 

मेळघाटातील ‘त्या’ वाघाचा मृत्यू पाच दिवसांपूर्वीचा; अहवालात स्पष्ट 

Next

चिखलदरा (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या रायपूर वनपरिक्षेत्रातील उत्तर माडीझडप बिटमध्ये एक नर वाघ गुरुवारी पहाटे गस्तीदरम्यान वनकर्मचाऱ्यांना मृतावस्थेत आढळला होता. त्याचा मृत्यू पाच ते सहा दिवसापूर्वीच झाल्याचे प्राथिमक शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. 

त्याचे शरीर पूर्णतः कुजलेले होते. परिणामी, मृत्यूच्या नेमक्या कारणासाठी वनविभागाला हैदराबाद व अमरावती येथील अहवालाची प्रतीक्षा आहे. वाघाच्या शरीरात अळ्या पडल्या होत्या. शरीर फुगले होते. व्याघ्र प्रकल्पाचे डॉ. प्रतीक जावरकर, सेमाडोह येथील डॉ. चिठोरे व डॉ. विजयकर यांनी त्या वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्याचा मृत्यू पाच ते सहा दिवसापूर्वीच झाल्याचे प्राथिमक शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

डीएनएसाठी नमुने हैदराबादला
शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टर चमूने आवश्यक नमुने अमरावती व हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. वाघाच्या मृत्यूनंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी गंभीर दखल घेत संपूर्ण परिसरात व्याघ्र प्रकल्पाच्या अधिनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.  

Web Title: The death of 'that' tiger in Melghat five days ago; Clear in the report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ