टाक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:29 PM2019-03-17T22:29:09+5:302019-03-17T22:29:46+5:30
येथील पावणेदोन वर्षे वयाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाक्यात पडून मृत्यू झाला. १६ मार्च रोजी सायंकाळी घडली. वंश शाम रोतळे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्या चिमुकल्या कलेवरावर रविवारी अंतिमसंस्कार करण्यात आले. येथील रोतळे कुटुंब पंचक्रोशीत मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कुटुंबावर हा प्रसंग गुदरला.
शिरजगाव बंड : येथील पावणेदोन वर्षे वयाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाक्यात पडून मृत्यू झाला. १६ मार्च रोजी सायंकाळी घडली. वंश शाम रोतळे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्या चिमुकल्या कलेवरावर रविवारी अंतिमसंस्कार करण्यात आले. येथील रोतळे कुटुंब पंचक्रोशीत मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कुटुंबावर हा प्रसंग गुदरला.
श्याम बजरंग रोतळे व पूजा श्याम रोतळे या दाम्प्त्याचा वंश हा पावणदोन वर्षे वयाचा चिमुकला शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घरातच खेळत होता. घटनेवेळी रोतळे दाम्पत्यही घरीच होते. दरम्यान चिमुकला वंश खेळता - खेळता घरातील दोन बाय तीन फूट आकारमान असलेल्या पाण्याच्या टाक्याजवळ गेला. त्यातील पाणी पाहताना त्याचा तोल गेल्याने तो टाक्यात पडला. काही वेळ ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. मात्र वंश दिसत नसल्याने लगेचच शोधाशोध झाली. पाण्याच्या टाक्यात तो निपचित पडलेला दिसला. त्याला तातडीने चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत वंशचा श्वास थांबला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान रविवारी सकाळच्या सुमारास त्याच्या इवल्याशा निष्प्राण देहावर अंतिमस्स्कार करण्यात आले. मूर्तिकार म्हणून मातीच्या गोळयाला आकार देणाऱ्या रोतळे कुटुंबांनी पोटचा गोळा गमावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.