शिवणी येथील महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 10:02 PM2018-10-02T22:02:20+5:302018-10-02T22:02:56+5:30

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथील २८ वर्षीय गर्भवतीचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला, तर नजीकच्या मंगरूळ चव्हाळा येथे चार डेंग्यूरुग्ण आढळले आहेत. वॉर्ड क्र. १ मधील हे रुग्ण असून, गावात भीती दाटली आहे.

Death of woman swine flu in Shimane | शिवणी येथील महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

शिवणी येथील महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

Next
ठळक मुद्देमंगरूळ येथे डेंग्यूचे चार रुग्ण : गावात अस्वच्छतेचा कहर

लोकमत न्यूज नेटवर्क
शिवणी रसुलापूर/मंगरूळ चव्हाळा : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर येथील २८ वर्षीय गर्भवतीचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला, तर नजीकच्या मंगरूळ चव्हाळा येथे चार डेंग्यूरुग्ण आढळले आहेत. वॉर्ड क्र. १ मधील हे रुग्ण असून, गावात भीती दाटली आहे.
शिवणी येथील राणी हंसध्वज जावळकर (२८) या गर्भवती महिलेचा नागपूर येथील खासगी रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. ती सात महिन्याची गर्भवती होती. तिला प्रारंभी अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात आठ दिवस दाखल केले. यानंतर सहा दिवसांपासून नागपूर येथे उपचार घेत होती, असे तिचे काका गुणवंत ढोके यांनी सांगितले. दरम्यान, मंगरूळ चव्हाळा येथे एकाच घरातील दोघे तारा सुरेश सोनोने (४२) व प्रज्ञा गजानन अवझाडे (८) या आत्या-भाची डेंग्यूरुग्ण आहेत. तारा सोनोने तंदुरुस्त झाल्या, तर आता प्रज्ञावर उपचार सुरू आहेत. घराजवळील दिव्यानी संतोष कुकडे (९) व ११ महिन्यांची अंजली महेंद्र शिंदे यांना यवतमाळ येथे जिल्हा सामान्य आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.
अस्वच्छतेचा कहर
येथील अंजली शिंदेला गावातील दोनशे फूट क्षेत्रफळाच्या खड्ड्यांतील डासांमुळे डेंग्यू झाल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. हा खड्डा आणखी किती जणांना डेंग्यूची लागण करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. अनेक ठिकाणी वाहत असलेल्या नाल्या अवरुद्ध झाले आहेत. अनेक ठिकाणी गावात खताचे ढिगारे आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हगणदरीमुक्त गाव असूनही ग्रामस्थ साखळी नदीवर व गावलागतच्या नाल्यावर उघड्यावर बसतात. ग्रामपंचायतमध्ये स्वच्छालय असले तरी पाण्याची टाकी धूळखात आहे.

माझ्या घरातील दोन व्यक्ती डेंग्यूबाधित आहे. एक बारा झाला आणि मुलीवर उपचार सुरू आहेत. घराच्या आजूबाजूने साफसफाई नसून, शेणखताचे ढिगारे आहेत. ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे.
- गजानन अवझाडे, ग्रामस्थ, मंगरूळ चव्हाळा

ग्रामपंचायतीतील प्रतिनिधी व सचिवांच्या हलगर्जीपणाने अजूनही खड्डा बुजविला गेला नाही. डासांची संख्या जैसे थे आहे. त्यामुळेच माझ्या ११ महिन्याच्या मुलीला डेंग्यूचा लागण झाली.
- महेंद्र शिंदे,
ग्रामस्थ, मंगरूळ चव्हाळा

Web Title: Death of woman swine flu in Shimane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.