शुल्क कपातीचा निर्णय : फटाक्यांची आतषबाजी, कुलसचिवांना भरविले पेढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:45+5:302021-07-01T04:10:45+5:30
विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांचा जल्लोष, भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश अमरावती : महाविद्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणाचे विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क ...
विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांचा जल्लोष, भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश
अमरावती : महाविद्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणाचे विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क न घेता यात कपात करण्यात येईल, असा निर्णय राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी घेतला. या निर्णयाचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमाेर फटाक्यांची आतषबाजीत विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केले. भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी कुलसचिवांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केेला.
राज्यभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क न घेता त्यात सूट द्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने राज्य सरकारकडे केली होती. अमरावती विद्यापीठाला भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कन्हेरकर यांच्या नेतृत्वात टाळे ठोकण्यात आल होते. या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करून शुल्क कपातीची मागणी करीत निषेध व्यक्त केला होता. याच महत्त्वपूर्ण विषयात विद्यार्थी आणि पालकांना त्वरित दिलासा द्यावा, याकरिता भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेऊन मागणी केली होती. त्याच निर्णयाचा आधार घेत राज्यातील सर्वच विद्यापीठांनी ही शुल्क कपात करावी, अशी घोषणा करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. शुल्क कपातीच्या निर्णयाचे भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कनेरकर, ऋषिकेश देशमुख, भाजयुमो महामंत्री अंकित चुंबळे,विरेंद्र लंगडे, अल्पेश जुनघरे, सिद्धेश देशमुख, सिद्धेश देशमुख आदींनी स्वागत केले. तसेच सन २०२०-२१ साठीही ऑनलाईन शिक्षणासाठी हा निर्णय लागू करावा, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व शाळांना सुद्धा हा निर्णय लागू करावा, अशी मागणी भाजयुमोने केली आहे.