नागरिकाच्या सजगतने विझविले पेटलेले झाड

By admin | Published: May 6, 2017 12:15 AM2017-05-06T00:15:26+5:302017-05-06T00:15:26+5:30

शेताचा धुरा जाळताना रस्त्याच्या कडेला असलेले झाड हेतुपुरस्सरपणे पेटविण्यात आले.

Decorated by a citizen, the quarrels burned | नागरिकाच्या सजगतने विझविले पेटलेले झाड

नागरिकाच्या सजगतने विझविले पेटलेले झाड

Next

दर्यापूर-मूर्तिजापूर मार्गावरील घटना : बांधकाम विभागाने पाठविला बंब
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : शेताचा धुरा जाळताना रस्त्याच्या कडेला असलेले झाड हेतुपुरस्सरपणे पेटविण्यात आले. मात्र, एका सजग नागरिकाच्या जागरूकतेमुळे हे हिरवे झाड संपूर्ण पेटण्यापासून वाचविण्यात आले आणि राष्ट्रीय संपत्तीची हानी टळली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झाडांच्या बुंध्यांना आग लावून लाकडांचा विविध कारणांसाठी उपयोग केला जात आहे. मात्र, यामुळे हिरवी झाडे नेस्तनाबूत होत आहेत. असाच प्रकार दर्यापूर-मूर्तिजापूर मार्गावर गणेशपूर फाट्यानजीक राज्य महामार्गावर सकाळी १० वाजताच्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या एका जागरूक नागरिकाने मोबाईलमध्ये पेटत्या झाडाचे चित्रिकरण करून हा व्हिडीओ दर्यापूरचे उपअभियंता भागवतकर यांना पाठविला. भागवतकर यांनी ही माहिती कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ यांना दिली. राष्ट्रीय संपत्तीची हानी टाळण्याकरिता बांधकाम विभागाने तत्काळ पालिकेला घटनास्थळी अग्निशमन बंब पाठविण्यास सांगितले. अग्निशमन बंबाने तत्काळ घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळविले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Decorated by a citizen, the quarrels burned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.