सिंंचन प्रकल्पांच्या पातळीत घट

By Admin | Published: January 11, 2015 10:44 PM2015-01-11T22:44:24+5:302015-01-11T22:44:24+5:30

अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता असल्याचा सिंचन विभागाने वर्तविली आहे. तालुक्यातील ९ प्रकल्पांमध्ये केवळ ७० टक्केच जलसाठा आहे.

Decrease in the level of irrigation projects | सिंंचन प्रकल्पांच्या पातळीत घट

सिंंचन प्रकल्पांच्या पातळीत घट

googlenewsNext

संजय खासबागे - वरुड
अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता असल्याचा सिंचन विभागाने वर्तविली आहे. तालुक्यातील ९ प्रकल्पांमध्ये केवळ ७० टक्केच जलसाठा आहे. जलाशयांमध्ये पावसाळयात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु आॅगस्टनंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने नद्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाईचे सुतोवाच सिंचन विभागाने केले आहे.
पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचयन क्षमता ५१४.६५ मीटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता १००.६० मीटर असून ओलीत क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४६१.७७ मिटर असून ओलीत क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ५००.७५ मीटर तर ओलीत क्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगाव प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४८०.५० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४८१.६० मीटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर, बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे आहे.
वघाळ बंधारा असून याची ओलीत क्षमता ४९६ हेक्टरची आहे. सिंंचन व्यवस्थापन शाखा वरुडच्या कक्षेत येत असलेल्या सिंंचन प्रकल्पांची ओलीत क्षमता ५ हजार १५५ हेक्टर असून सिंंचन क्षेत्र २ हजार ३५० हेक्टर ओलीत क्षेत्र आहे. यावर्षी आॅगस्टमध्ये सर्व प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होता. नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने आणि तापमानातसुध्दा वाढ झाल्याने जलसाठा कमी होऊन जानेवारीमध्ये केवळ ७० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. एरवी जानेवारीपर्यंत वाहणाऱ्या नद्यासुध्दा कोरड्या पडल्या आहेत. रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणी वापर संस्थांना पाणी द्यावे लागते. या व्यतिरिक्त काही गावांनाही पिण्याकरिता पाणीपुरवठा होत आहे.
पाकनाला प्रकल्पाला दरवाजा नसल्याने जलसंचय होऊ शकला नाही. नागठाणा-२,मध्ये पाणी साठविणे सुरु आहे. तालुक्यातील १४ पाणी वापर संस्था असून वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादकांकरिता सिंचन व्यवस्था नसल्याने हवालदिल झाले आहेत. पाणी पातळी खोलवर गेली आहे. तालुक्यातील २३ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्राबागा आहेत. यापैकी १६ हजार हेक्टरमध्ये फळधारणा करणारी संत्राझाडे आहेत. गहू, हरभरा तसेच संत्रा, कपाशी, मिरची आदी बागायती पिके घेण्यात येतात. परंतु अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता सिंचन विभागाचे अभियंता सोनारे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Decrease in the level of irrigation projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.