चिखली परिसरात कोरोना रुग्ण संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:26+5:302021-05-16T04:13:26+5:30
फोटो पी १६ चिखली चिखलदरा : तालुक्यातील चिखली जिल्हा परिषद सर्कलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश येत असून, ...
फोटो पी १६ चिखली
चिखलदरा : तालुक्यातील चिखली जिल्हा परिषद सर्कलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश येत असून, जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे यांच्यासह कार्यकर्ता गावागावांत नागरिकांना सतर्कतेचा संदेश देत आहेत.
मेळघाटात दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. चिखली १२० नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याने ते हॉटस्पॉट ठरले होते. या सर्व रुग्णांवर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, तालुका आरोग्य अधिकारी सतीश प्रधान, अधिकारी रोहन गीते, डॉ. अंकुश देशमुख यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अथक प्रयत्न केले. चिखली येथे सद्यस्थितीत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र गाफील न राहता पुन्हा तपासणी कॅम्प घेऊन कोरोना रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर येथे उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. आवश्यक असलेला औषधोपचार खुद्द जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे यांनी उपलब्ध करून दिला.
बॉक्स
घरात सुरक्षित रहा
चिखली, तारूबांदा, केसरपूर, भिरोजा या परिसरातील गावांमध्ये नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करूनच सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे यांनी केले आहे. आदिवासींना योग्य उपचार मिळावे, यासाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरत असल्याच्या त्या म्हणाल्या.