सिंचन प्रकल्पांच्या जलपातळीत घट

By admin | Published: April 19, 2015 12:19 AM2015-04-19T00:19:24+5:302015-04-19T00:19:24+5:30

वरुड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Decrease in water supply of irrigation projects | सिंचन प्रकल्पांच्या जलपातळीत घट

सिंचन प्रकल्पांच्या जलपातळीत घट

Next

प्रकल्पात २५ ते ३० टक्केच जलसाठा : नद्याही पडल्या कोरड्या
वरूड : वरुड तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळ्यात १०० टक्के जलसाठा संचयित झाला होता. परंतु आॅगस्टनंतरच पावसाने दडी मारल्याने जानेवारीपर्यंत वाहणाऱ्या नदीचा प्रवाहसुध्दा खंडित झाला आहे.
पाणी वापर संस्थांनी वेळेआधीच पिकांना पाणी सोडण्यासाठी मागणी केल्याने सिंचन प्रकल्पातील जलसाठा कमालीचा घटला आहे. तापत्या उन्हामुळे तापमानाच्या फरकाने प्रकल्पात केवळ २५ ते ३० टक्के जलसाठा आहे. येत्या काळात तीव्र पाणी टंचाईचे सूतोवाच सिंचन विभागाने केले आहे.
शेकदरी प्रकल्प व पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ५१४.६५ मीटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर एवढी आहे. पुसली प्रकल्पात जलसंचय क्षमता १००.६० मीटर असून ओलीत क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पात पूर्ण जल संचय क्षमता ४६१.७७ मीटर असून ओलीत क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयन क्षमता ५००.७५ मिटर तर ओलीत क्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगाव प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता ४८०.५० मिटर आहे. ओलीत क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता ४८१.६० मीटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर ,जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचयन क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर ,बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर,लोणी धवलगीरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे आहे. वघाळ बंधारा असून ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. सिंंचन व्यवस्थापन शाखा वरुडच्या कक्षेत येत असलेल्या सिंंचन प्रकल्पाची ओलीत क्षमता ५ हजार १५५ हेक्टरची असून सिंंचन क्षेत्र २ हजार ३५० हेक्टर ओलीत क्षेत्र आहे. परंतु यावर्षी आॅगस्टमध्ये सर्व प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा होता. नंतरच्या काळात पावसाने दडी मारल्याने आणि तापमानात वाढ झाल्याने जलसाठा कमी होऊन नोव्हेंबरमध्ये केवळ ८५ टक्के होता. जानेवारीत ७० टक्के, फेब्रुवारीत ६० ते ६५ टक्के आणि मार्चमध्ये ३० ते ४० टक्के परंतु एप्रिलमध्ये तापमानात वाढ झाल्याने सदर जलसाठा केवळ २५ ते ३० टक्क्यांवरच आला आहे. त्यामुळे नद्यासुध्दा कोरड्या पडल्या आहेत. रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणी वापर संस्थांना पाणी द्यावे लागते तर नद्यांनासुध्दा पाणी सोडले होते. या व्यतिरिक्त काही गावांना पिण्याकरिता पाणीपुरवठासुध्दा केल्या जातो. याव्यतिरिक्त पाकनाला प्रकल्पाला दरवाजा बसलेला नसल्याने तांत्रिक दोषामुळे जलसंचयन होवू शकले नाही. नागठाणा-२,मध्ये पाणी साठविणे सुरु आहे. तालुक्यातील १४ पाणी वापर संस्था असून विदर्भाचा कॅलीफोर्निया असलेला वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी सिंंचनाकरिता आवश्यक व्यवस्था नसल्याने हवालदिल झाले. पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. तालुक्यात २३ हजार ५०० हेक्टर शेतजमिन संत्रा लागवडीखाली असून यापैकी १६ हजार हेक्टर जमिनीत फळधारणा करणारी संत्रा झाडे आहे. रबी हंगामातील गहू, चना व संत्रा आणि कपाशी, मिरची आदी बागायती पिके घेण्यात येते. अत्यल्प पर्जन्यमानामुळे पाणी पुरवठ्यात तूट येण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Decrease in water supply of irrigation projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.