तालुक्यात विविध कामांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:17 AM2021-08-18T04:17:50+5:302021-08-18T04:17:50+5:30
फोटो - चांदूर रेल्वे १७ पी जिल्हा परिषद निधी अंतर्गत वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन चांदूर रेल्वे : स्वातंत्र्य ...
फोटो - चांदूर रेल्वे १७ पी
जिल्हा परिषद निधी अंतर्गत वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन
चांदूर रेल्वे : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यात जिल्हा परिषद निधी अंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद सभापती सुरेश निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ८१ लाख रुपयांच्या विकासनिधीचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले.
तालुक्यातील चिरोडी, लालखेड, नया सावंगा, मांजरखेड कसबा या गावातील जिल्हा परिषद शाळांचे संरक्षणभिंती, वर्गखोली बांधकाम आणि दुरुस्ती, नाली बांधकाम, शौचालय बांधकाम, मांजरखेड येथील पाताळेश्वर मंदिराच्या घाट बांधकामाचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला. या सर्व कामांसाठी जिल्हा परिषदेने ८१ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याच वेळी मांजरखेड येथील कोरोना लसीकरण शिबिराचेही वीरेंद्र जगताप यांनी उद्घाटन केले. एकूण २०० लसींचे डोस यावेळी आरोग्य विभागाने दिले होते. या सर्व कार्यक्रमाला विविध ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य नितीन गोंडाणे, पंचायत समिती सदस्य अमोल होले यांच्यासह लालखेडचे सरपंच मुक्ताबाई राठोड, उपसरपंच तारासिंग चव्हाण, चिरोडी येथील सरपंच राजेश चव्हाण, उपसरपंच संदीप कुमरे, नया सावंगा येथील सरपंच बंडू भोजने, उपसरपंच काशीनाथ मेश्राम, मांजरखेड कसबा येथील सरपंच दिलीप गुल्हाने, उपसरपंच किरण देशमुख, अशोक देशमुख, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
170821\1036-img-20210817-wa0000.jpg
photo