जिल्ह्यातील २३१ गावांत तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: June 29, 2014 11:41 PM2014-06-29T23:41:08+5:302014-06-29T23:41:08+5:30
रोहिणी, मृग व आर्द्रा कोरडे गेले आहेत, मान्सूनने दडी मारली, दिवसेंदिवस जलस्त्रोताचे जलस्तर झपाट्याने कमी होत आहे. तूर्तास जिल्ह्यातील २३१ गावांत कमीअधिक प्रमाणात पाणीटंचाई आहे.
अमरावती : रोहिणी, मृग व आर्द्रा कोरडे गेले आहेत, मान्सूनने दडी मारली, दिवसेंदिवस जलस्त्रोताचे जलस्तर झपाट्याने कमी होत आहे. तूर्तास जिल्ह्यातील २३१ गावांत कमीअधिक प्रमाणात पाणीटंचाई आहे. उंच व दुर्गम भाग असणाऱ्या चिखलदरा तालुक्यात नऊ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ २ कोटी ११ लाखांची २६९ कामे सुरू आहेत.
पाणी टंचाईचा कृती आराखड्याचा तिसरा टप्पा एप्रिल ते जून २०१४ दरम्यान आहे. पाणी टंचाईच्या या तिसऱ्या टप्प्यातील अंतिम चरणात पाऊस नसल्यामुळे लहानमोठी गावे व वस्त्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणऊ लागल्या आहेत. यामध्ये १३ गावांमध्ये तात्पूरती पूरक नळ योजना १३, नळ योजनांची विशेष दुरूस्ती ७३, नवीन विंधन विहिरी २१७ यांसह इतर कामांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत १४ गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरूस्ती सुरू आहे. १६ ठिकाणी नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या आहेत.
सात ठिकाणी खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून अन्य कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)