दीपक शिरभाते यांना पेटंट बहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:00+5:302021-03-14T04:13:00+5:30
बाजारात उपलब्ध असलेल्या विजेवर चालणाऱ्या पाणी तापविण्याच्या उपकरणाप्रमाणे काही सेकंदातच पाणी गरम होणे हे त्या उपकरणाचे वैशिष्ट्य आहे. शिरभाते ...
बाजारात उपलब्ध असलेल्या विजेवर चालणाऱ्या पाणी तापविण्याच्या उपकरणाप्रमाणे काही सेकंदातच पाणी गरम होणे हे त्या उपकरणाचे वैशिष्ट्य आहे. शिरभाते यांनी त्यांचे सहकारी उदय मेहरे तसेच राम मेघे अभियांत्रिकी व संशोधन संस्था बडनेराचे यंत्र अभियांत्रिकी शाखेचे विभागप्रमुख दिलीप इंगोले यांच्या मदतीने सदर उपकरणाची डिझाईन व निर्मिती केली. ग्रामीण भागात उपलब्ध झाडांचा पाला पाचोळा, वाळवलेल्या झाडांच्या फांद्या, गोवऱ्या, कागदाचे तुकडे, लाकूडफाटा आदी इंधन या उपकरणाकरिता उपयोगात आणता येऊ शकते. हे उपकरण वजनाने अत्यंत हलके असून याकरिता १ चौरस फूट इतकी कमी जागा लागते. ग्रामीण भागात प्रदूषणाची समस्या नसल्यामुळे पाणी तापविण्याकरिता हे उपकरण अत्यंत उपयोगी आहे. दीपक शिरभाते यांनी तंत्रनिकेतनाच्या वसतिगृहावर सदर उपकरणाची चाचणी घेऊन उपयुक्तता सिद्ध केली. शिरभाते यांनी या पेटंटचे श्रेय संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती अर्जुन, सचिव आर. एस. राव, सहकारी तसेच, विद्यार्थ्यांना दिले.
पान ३