दीपाली चव्हाण आत्महत्या (बातमीचा जोड)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:13 AM2021-03-27T04:13:43+5:302021-03-27T04:13:43+5:30
एसपींची एंट्री व नातेवाईकांचा घेरावा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांची एंट्री होताच मृताच्या नावतेवाईकांनी ...
एसपींची एंट्री व नातेवाईकांचा घेरावा
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांची एंट्री होताच मृताच्या नावतेवाईकांनी व महाराष्ट्र राज्य बेलदार भटक्या समाज बांधवांनी एसपींना घेराव घालत शिवकुमारला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना निलंबित करून त्यांनाही सहआरोपी करा, गुन्हा नोंदवून अटकेची जोरदार मागणी केली. एसपींनी त्यांच्याशी चर्चा करण्याच्या प्रयत्न केला. मात्र, नातेवाईक ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. एसपींनी यावेळी योग्य कायदेशीर कारवाई करू, असे सांगितले. यावेळी एसीपींनी शवविच्छेदन केंद्रात मृतदेहाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
बॉक्स
शवविच्छेदन केंद्रासमोर शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
सकाळपासूनच इर्विनकडून रेल्वेस्टेनकडे जाणाऱ्या एका बाजूचा मार्ग बंद करून शवविच्छेदन केंद्रासमोर राजापेठ, सिटी कोतवाली पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला. डीसीपी(एडमीन) विक्रम साळी हे घटनास्थळी हजर होते. सीपी आरती सिंहसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होत्या. राज्य राखीव दलाचे पथक तैनात ठेवण्यात आले होते.
बॉक्स
मैत्रिण गेल्याचे दुख
दीपालीसोबत मी एमएसीला होती. ती शांत स्वभावाची होती. तिने असा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळताच ही घटना मनाला फार चटका देणारी ठरली. अनेक कारवाया करीत तिने चांगला अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला होता. मात्र, तिचे आकस्मिक जाण्याने मित्रपरिवाराची फार मोठ हानी झाली, अशी प्रतिक्रिया देताना दीपाली यांची वर्गमैत्रिण व वनखात्यातील सहकारी घटांग येथील सहायक वनसंरक्षक विद्या वरुव यांनी भावना व्यक्त केली. वनखात्यात ती माझ्यापूर्वी नोकरीत रुजू झाली. गत सहा वर्षांपूर्वी ती नोकरीत रुजू झाली होती. यावेळी वनविभागातील इतर महिला व पुरुष अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन केंद्रावर गर्दी केली होती.