दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : रेड्डीच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर आज सरकार पक्ष बाजू मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 07:40 AM2021-04-03T07:40:49+5:302021-04-03T07:41:12+5:30

गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्या वकिलाने अचलपूर येथील जलदगती न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर शनिवारी सरकारी पक्षातर्फे तपास अधिकाऱ्यांकडून ‘से’ दाखल होण्याची शक्यता आहे

Deepali Chavan suicide case: The government will present its case on Reddy's interim bail today | दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : रेड्डीच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर आज सरकार पक्ष बाजू मांडणार

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : रेड्डीच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर आज सरकार पक्ष बाजू मांडणार

Next

परतवाडा (जि. अमरावती) : गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्या वकिलाने अचलपूर येथील जलदगती न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर शनिवारी सरकारी पक्षातर्फे तपास अधिकाऱ्यांकडून ‘से’ दाखल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी वनकर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले आहे. 
दीपाली आत्महत्या प्रकरणात  उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला अटक करण्यात आली आहे. धारणी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. शिवकुमार याच्या त्रासासंदर्भात दीपालीने रेड्डी यांना पत्राद्वारे माहिती दिली होती. मात्र, त्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आत्महत्या प्रकरणात रेड्डींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याच्या व अटकेच्या भीतीने रेड्डी घाबरले आहेत. त्यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवार, ३ एप्रिल रोजी सरकारी अभियोक्ता किंवा तपास अधिकाऱ्यांना ‘से’ दाखल करण्याचे सुचविले आहे. 

पत्र जप्त 
दीपाली यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्यांच्या सहकारी वनमजूर वनपाल व कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले आहे. तसेच झालेला पत्रव्यवहार आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतली असून त्यात अनेक बाबींचा खुलासा होण्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पोलिसांनी गनिमी काव्याने नेले शिवकुमारला  शिवकुमार याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर लोकांपासून वाचवत अमरावती कारागृहात नेण्यासाठी पोलिसांनी गनिमी काव्याचा अवलंब करीत त्याला पाच तालुके फिरवले. शुक्रवारी ही माहिती उघड झाली. या आत्महत्या प्रकरणात संपूर्ण राज्यभर विविध संघटना व नागरिकांच्या संतापाच्या उद्रेकाची शक्यता 
पाहता, आरोपीच्या सुरक्षिततेचे दडपण पोलिसांवर आले होते. 
 शिवकुमारला धारणी, हरिसाल सेमाडोह, परतवाडा या मार्गाने अमरावती कारागृहात नेल्यास दगडफेक तसेच जनआक्रोशाचा सामना करावा लागेल, 
अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. 
यामुळे पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात धारणी, ढाकना, खोंगडा (ता. चिखलदरा), परसापूर, 
पथ्रोट, (ता. अचलपूर), अंजनगाव सुर्जी, 
दर्यापूरमार्गे अमरावती असा पाच तालुक्यांतून प्रवास केला. 

दीपाली आत्महत्येची चौकशी महिला आयपीएसमार्फत करा - फडणवीस
मुंबई : मेळघाटमधील वनअधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची चौकशी ज्येष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. जलदगती न्यायालयात खटला चालवावा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशाही मागण्या त्यांनी केल्या.
फडणवीस यांनी म्हटले की, वयाच्या तिशीत असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. त्याबाबत आरोप असलेल्यांची सुरुवातीला केवळ बदली होते. आंदोलने झाल्यानंतरच अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. 
खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते; पण तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमली गेली, असेही फडणवीस म्हणाले.

Web Title: Deepali Chavan suicide case: The government will present its case on Reddy's interim bail today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.