Deepali Chavan Suicide Case: अटक टाळण्यासाठी रेड्डी न्यायालयात, पण दिलासा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 07:58 AM2021-04-01T07:58:49+5:302021-04-01T07:59:39+5:30

Deepali Chavan Suicide Case: मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याने बुधवारी अचलपूर येथील जलदगती न्यायालयात दाखल केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर तपास अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेतली जाईल.

Deepali Chavan Suicide Case: Reddy in court to avoid arrest, but no consolation | Deepali Chavan Suicide Case: अटक टाळण्यासाठी रेड्डी न्यायालयात, पण दिलासा नाही

Deepali Chavan Suicide Case: अटक टाळण्यासाठी रेड्डी न्यायालयात, पण दिलासा नाही

Next

परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याने बुधवारी अचलपूर येथील जलदगती न्यायालयात दाखल केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर तपास अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेतली जाईल. त्यानंतरच निर्णय होईल, असे न्यायमूर्ती एस.के. मुंगीनवार यांच्या न्यायालयाने स्पष्ट केल्याने रेड्डीला तूर्त दिलासा मिळाला नाही. अटकपूर्व अर्जावर ३ एप्रिल रोजी यासंबंधी सरकारी अभियोक्ता किंवा तपास अधिकारी यांना ३ एप्रिल रोजी म्हणणे मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला धारणी न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडीत पाठविले. त्यानंतर त्याला पाठीशी घालणाऱ्या अमरावती वनवृत्ताच्या तत्कालीन निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असताना  बुधवारी त्याच्या वकिलांतर्फे अचलपूर येथील जलदगती न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्यात आला होता. मात्र, जलदगती न्यायालयाने रेड्डी याच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर ते म्हणणे ग्राह्य न धरता केलेल्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर सरकारी बाजू ऐकल्यानंतरच निर्णय होईल. त्यानुसार सरकारी पक्षाला तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे दाखल करण्याबाबत समन्स बजावले आहे. 

रेड्डींच्या निलंबनाचे आदेश धडकले
नागपूर : दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश अखेर २४ तासांनंतर निघाले आहेत. मंगळवारी दुपारपासून त्यांच्या निलंबनाचे आदेश तयार असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दडपणामुळे त्यात विलंब होत होता. अखेर वन मंत्रालयाने खंबीर भूमिका घेत बुधवारी उशिरा हे आदेश निर्गमित केले.
मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) अरविंद आपटे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित झाले असून, या निलंबन काळात रेड्डी यांचे मुख्यालय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) कार्यालय हे असेल. दरम्यान, दीपाली आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांना नोटीस बजावली आहे.

Web Title: Deepali Chavan Suicide Case: Reddy in court to avoid arrest, but no consolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.