Deepali Chavan Suicide Case : हरिसालच्या होलिकात्सवात रेड्डी, विनोद शिवकुमार बालाचे प्रतिकात्मक पोस्स्टरचे दहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 08:32 PM2021-03-28T20:32:53+5:302021-03-28T20:33:50+5:30

Deepali Chavan Suicide Case : रविवारी हरिसाल येथे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक होळीचे दहन करताना उपस्थित काही महिला कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडत अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली.

Deepali Chavan Suicide Case: Symbolic poster burning of Reddy, Vinod Shivkumar Bala at Harisal Holikatsava | Deepali Chavan Suicide Case : हरिसालच्या होलिकात्सवात रेड्डी, विनोद शिवकुमार बालाचे प्रतिकात्मक पोस्स्टरचे दहन

Deepali Chavan Suicide Case : हरिसालच्या होलिकात्सवात रेड्डी, विनोद शिवकुमार बालाचे प्रतिकात्मक पोस्स्टरचे दहन

googlenewsNext

धारणी/ चिखलदरा (अमरावती) : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात वन कर्मचाऱ्यांनी हरिसाल येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता मेळघाटचे तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी आणि निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला यांचे पोस्टर लावून होळीचे दहन केले. (Deepali Chavan Suicide Case : Symbolic poster burning of M S Reddy, Vinod Shivkumar Bala at Harisal Holikatsava)

यावेळी दीपाली चव्हाण अमर रहे, एम. एस. रेड्डी मुर्दाबाद, विनोद शिवकुमार बाला मुर्दाबाद असे नारे लावत दोघांच्या फोटोंना महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी चपलेचा प्रसाद दिला. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. सर्वत्र या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला फाशी देण्यासह त्याला बळ देणाऱ्या एम एस. रेड्डींनाही निलंबित व बडतर्फ करण्याची मागणी वनपाल वनकर्मचारी संघटनेच्यावतीने लावून धरण्यात आली आहे. रविवारी खासदार नवनीत राणा व बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याकडे वनपाल व वन कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडल्या. मोठ्या प्रमाणात वन विभागातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अनेक दीपाली आहेत वनविभागात
रविवारी हरिसाल येथे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक होळीचे दहन करताना उपस्थित काही महिला कर्मचाऱ्यांनी व्यथा मांडत अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली. गावकरी व अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. विनोद शिवकुमार बालाचे अनेक कारनामे यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी पुढे आणले.

क्रूर प्रवृत्तीचे दहन
आरोपी विनोद शिवकुमार बाला व अन्य अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून अजूनही कुणी महिला कर्मचारी व इतर कर्मचारी बळी पडू नये, त्या राबवून घेण्याच्या कुप्रवृत्तीचे दहन करण्याचा निर्णय वनपाल वनरक्षक संघटनेने घेतला. या क्रूर प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांचे पोस्टर होळीला गुंडाळून जाळण्यात आले. वनपाल, वनकर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी संघटनेचे विविध पदाधिकारी कर्मचारी, गावकरी उपस्थित होते.

Web Title: Deepali Chavan Suicide Case: Symbolic poster burning of Reddy, Vinod Shivkumar Bala at Harisal Holikatsava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.