एक दिवसाच्या तापाने वाढदिवशीच दगावला दीपांशु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:16 AM2021-08-14T04:16:41+5:302021-08-14T04:16:41+5:30
फोटो - वरूड १३ पी वरूड : वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच स्थानिक सावता चौक परिसरातील १२ वर्षीय दीपांशुला दुपारी ...
फोटो - वरूड १३ पी
वरूड : वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच स्थानिक सावता चौक परिसरातील १२ वर्षीय दीपांशुला दुपारी २ च्या सुमारास ताप आला. त्यावर उपचार करून घरी आणताच पुन्हा ६ पासून ताप चढला. नागपूरला नेत असताना वाटेतच त्याने रात्री १११.३० च्या सुमारास शेवटचा श्वास घेतला. रडके कुटुंबावर हा प्रसंग १० ऑगस्ट रोजी ओढवला.
स्थानिक सावता चौक परिसरात दीपक रडके हे पत्नी, मुलगा दीपांशु आणि मुलगी राणीसह वासल्व्यास होते. दीपांशुचा १० आॅगस्टला वाढदिवस होता. त्यामुळे घरी आनंदी वातावरण होते. अचानक दुपारच्या २ च्या सुमारास दीपांशुला ताप आला. आईने त्याला रुग्णालयात नेले आणि घरी आणले. सायंकाळी ६ वाजता ताप वाढल्याने स्थानिक डॉक्टरांकडे नेले. त्यांनी तातडीने नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रात्रीचे साडेअकराच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला. दीपांशु हा जागृत विद्यालयातील सातव्या वर्गाचा विद्यार्थी होता. नगर परिषद मोक्षधाममध्ये त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.