बनावट इन्सटाग्राम, फेसबूक अकाऊंट तयार करून तरुणीची बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:55+5:302021-06-19T04:09:55+5:30
पोलीससुत्रानुसार, अनिकेत सुरेशराव रोहनकर (२६, रा. जुनी वस्ती बडनेरा) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी तरुणी व आरोपी हे ऐकामेकांना ...
पोलीससुत्रानुसार, अनिकेत सुरेशराव रोहनकर (२६, रा. जुनी वस्ती बडनेरा) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी तरुणी व आरोपी हे ऐकामेकांना ऑनलाईन ओळखत होते. सन २०१९ पर्यंत एकामेकांशी बोलणे होते. मात जून २०१९ पासून तरुणीने आरोपीशी पुर्णपणे संबध तोडले. परंतू एप्रिल २०१९ पासून आरोपीने तरुणीला फोन व एसएमएस करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिने त्याचा नंबर ब्लॉक केला असता, आरोपीने तिचे बनावट फेसबुक व इन्सटाग्राम अकाऊंट तयार करुन तिची बदनामी करण्याणा प्रयत्न केला. तिने सायबर पोलिसांशी संपर्क करून अकाऊंट बंद केले. त्यानंतर तरुणीने आरोपीच्या आईला भेटून या संदर्भात माहिती दिली असता, त्याने पुन्हा तिला त्रास दिला. त्यानंतर मात्र त्याने टेक्स मॅसेज पाठवून तिला अश्लील शिवीगाळ केली व मारहाण करण्याची धमकी दिली. त्रासाला कंटाळून तिने अखेर पोलिसात धाव घेवून तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादविची कलम ३५४(ड) अन्वये नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.