‘लोकतंत्र बचाव - संविधान बचाव’ शहर काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:34 PM2018-01-28T22:34:09+5:302018-01-28T22:34:43+5:30

देशाच्या इतिहासात कधी नव्हे एवढी नागरिकांच्या हक्कांची व अधिकारांची गळचेपी होत आहे.

'Defending Democracy - Reservation of Constitution' City Congress demonstrations | ‘लोकतंत्र बचाव - संविधान बचाव’ शहर काँग्रेसची निदर्शने

‘लोकतंत्र बचाव - संविधान बचाव’ शहर काँग्रेसची निदर्शने

Next
ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोर आंदोलन : भाजप सरकारविरोधात घोषणा

आॅनलाईन लोकमत
अमरावती : देशाच्या इतिहासात कधी नव्हे एवढी नागरिकांच्या हक्कांची व अधिकारांची गळचेपी होत आहे. लोकशाहीविरोधी वर्तन करणाऱ्या भाजप सरकारपासून देशाच्या संविधानाचे संरक्षण करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहराध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात संविधान बचाव, लोकतंत्र बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ जानेवारी रोजी शहर काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत प्रशासनाचे व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. भाजप सरकारकडून प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाला धमकावले जात असून, विरोधात लिखाण करणाऱ्यांची प्रचंड गळचेपी करण्यात येत आहे. त्याच्यावर बंदी घालण्यापर्यंत या सरकारची मजल गेली आहे. असे प्रकार भाजप सरकारच्याच कार्यकाळात वाढले आहेत. लोकतंत्र बचाव, संविधान बचाव मोर्चाद्वारा शहर काँग्रेसने भाजप सरकारसह नागरिकांचे याकडे लक्ष वेधले असल्याचे शहराध्यक्ष किशोर बोरकर म्हणाले.
आंदोलनात गणेश पाटील, बबलू शेखावत, विलास इंगोले, प्रल्हाद ठाकरे, बी.आर देशमुख, पुरुषोत्तम मुंदडा, हरिभाऊ मोहोड, भास्कर रिठे, भैयासाहेब निचळ, भारती पाटील, जयश्री वानखडे, अर्चना सवाई, देवायनी कुर्वे, सविता धांडे, अभिनंदन पेंढारी व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: 'Defending Democracy - Reservation of Constitution' City Congress demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.