कर यंत्रणेत खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:06 PM2018-04-15T23:06:20+5:302018-04-15T23:06:20+5:30

नव्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात अर्थात मे मध्ये कर व स्वच्छता यंत्रणेत व्यापक फेरबदल करण्यात येणार आहेत. हे बदल करवसुली लिपिक, सहायक आयुक्त, स्वास्थ्य निरीक्षक, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांपर्यंत व्यापक असतील. महापालिका प्रशासनप्रमुख हेमंत पवार यांनी याअंतर्गत खांदेपालटाचे सुतोवाच केले आहे.

Deferred tax administration | कर यंत्रणेत खांदेपालट

कर यंत्रणेत खांदेपालट

Next
ठळक मुद्देकाही नव्या मालमत्ता रेकॉर्डवर नाहीत : मोनोपल्ली मोडून काढण्याचे पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नव्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात अर्थात मे मध्ये कर व स्वच्छता यंत्रणेत व्यापक फेरबदल करण्यात येणार आहेत. हे बदल करवसुली लिपिक, सहायक आयुक्त, स्वास्थ्य निरीक्षक, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांपर्यंत व्यापक असतील. महापालिका प्रशासनप्रमुख हेमंत पवार यांनी याअंतर्गत खांदेपालटाचे सुतोवाच केले आहे.
अनेक वर्षांपासून करवसुली लिपिक त्याच प्रभागात व एकाच झोनमध्ये कार्यरत असल्याने त्यांची मोनोपल्ली वाढली आहे. दुसऱ्या कर लिपिकाला ते आपल्या प्रभागात प्रवेशही देत नाहीत. अनेक नव्या मालमत्ता या करवसुली लिपिकांना ज्ञात असतानाही त्या रेकॉर्डवर येत नाहीत, अनेक मालमत्तांमध्ये झालेले बदल, अनधिकृत बांधकाम करवसुली लिपिकांच्या डोळ्यातून सुटत नाही. तथापि, ती माहिती अधिकृतरीत्या प्रशासनाकडे पोहोचत नसल्याने महापालिकेला मोठ्या रकमेच्या कराला मुकावे लागते. एवढेच काय तर काही-काही करवसुली लिपिकांचे बंगले नजरेत भरण्यासारखे आहेत. त्यातून या यंत्रणेला भ्रष्टाचाराने पोखरल्याचे निरीक्षण आयुक्त पवार यांनी नोंदविले होते. त्यावर त्यांनी गतवर्षी बदलीचा उतारा शोधला होता. मात्र, आता बदल्या केल्यास नव्या लिपिकांना घरे शोधण्यास अडचणी निर्माण होतील, ही सबब पुढे करून तत्कालीन स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी त्या बदल्या थांबविल्या. त्यानंतर याच करवसुली लिपिकांनी २० हजार नव्या मालमत्ता शोधून काढल्याचा दावा संयुक्तपणे करण्यात आला. त्या मालमत्ता या करवसुली लिपिकांनी शोधल्यात की, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी हा भाग वादातीत असला तरी याच यंत्रणेने मावळत्या आर्थिक वर्षात ४७.२२ कोटी मागणीच्या तुलनेत ३६ कोटी वसूल केलेत, ही वस्तुस्थिती आहे. करयंत्रणाही आता थोडी सैल झाली आहे. ताण कमी झाला आहे. त्या पार्श्वभूमिवर करवसुली लिपिकांचे बदली सत्र राबविले जाणार आहे. एप्रिल-मे मध्ये खांदेपालट केल्यास संबंधित करवसुली लिपिकाला संबंधित प्रभागाचे बारकावे समजावून घेण्यास पुरेसा वेळ मिळेल, भ्रष्टाचाराला लगाम बसेल आणि कुठल्याही बाबूला एसीबीत देण्याची गरज भासणार नाही. या भूमिकेतून कर यंत्रणेत व्यापक फेरबदल करण्यात येणार आहे.
स्वास्थ्य निरीक्षकांच्याही बदल्या
तूर्तास २२ प्रभागांत ४३ स्वास्थ्य निरीक्षक व ५ ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कार्यरत आहेत. त्यांची अदलाबदलीसुद्धा करण्यात येणार आहे. अनेक स्वास्थ्य निरीक्षकांवर संबंधित नगरसेवकांचा अधिक लोभ असल्याने ते एकाच ठिकाणी चिटकले आहेत. याशिवाय मुख्यालयात काम करण्यास ‘रस’ नसलेल्या एका वैद्यकीय अधिकाºयाची बदली प्रस्तावित आहे. या डॉक्टरने अनेकदा स्वत:हूनच बदली मागून आपल्याला काम करण्यात इंटरेस्ट नसल्याचे प्रशासनाला कळविले असल्याने त्यांच्या बदलीचीही शक्यता बळावली आहे.

Web Title: Deferred tax administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.