पदवी, पदव्युत्तर प्रवेशास १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:09 AM2021-01-01T04:09:29+5:302021-01-01T04:09:29+5:30
अमरावती: विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ करिता सत्र व वर्षातील सर्व पदवी, पदव्युत्तर (पदवी, पदविका) अभ्यासक्रमास १५ जानेवारी २०२१ ...
अमरावती: विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ करिता सत्र व वर्षातील सर्व पदवी, पदव्युत्तर (पदवी, पदविका) अभ्यासक्रमास १५ जानेवारी २०२१ पर्यत प्रवेशास मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिसूचना क्रमांक ११७/२०२० अन्वये ३१ डिसेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित असणाऱ्या
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अंतिम वर्ष, अंतिम सत्राचा निकाल फुगल्याने पदव्युत्तर प्रवेशासाठी विद्यार्थ्याची अतिशय दमछाक होत आहे. विद्यापीठ अथवा महाविद्यांलयामध्ये ३१ डिसेंबरपर्यंत पदवी,पीजी प्रवेश प्रक्रिया आटोपली आहे. मात्र, अद्यापही शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहे. त्यामुळे पीजी प्रवेश जागावाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असताना तूर्त मान्यता मिळालेली नाही. परंतु, पीजी, पदवी प्रवेशाला १५ जानेवारीपर्यंत विद्यापीठाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
-------------------
कोट
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रवेशाच्या जागा कमी असल्याने अनेकांना पदवी, पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित रहावे लागेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे प्राचार्याना पत्राद्धारे पदवी, पदव्युत्तर प्रवेशाची अंमलबजावणी १५ जानेवारीपर्यंत करावी, असे कळविले आहे.
- राजेश जयपूरकर. प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.