निविदा प्रक्रियेतील विलंब कुणाच्या पथ्थ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:32+5:302021-04-29T04:09:32+5:30
महापालिकेत कर्मचारी भरती प्रक्रिया थांबलेली असल्याने प्रशासनाचा डोलारा सध्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच आहे व हे मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंत्राटदाराचा कालावधी ७ ...
महापालिकेत कर्मचारी भरती प्रक्रिया थांबलेली असल्याने प्रशासनाचा डोलारा सध्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच आहे व हे मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंत्राटदाराचा कालावधी ७ नोव्हेंबर २०२० ला संपुष्टात आलेला आहे. प्रत्यक्षात या कंत्राटदाराचा कालावधी संपण्याचे दोन महिन्यांपूर्व संबंधित विभागाने निविदा प्रक्रिया सुरू करणे अभिप्रेत असताना याच कंत्राटदाराला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली व नंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यात चार निविदा प्राप्त झाल्या व सर्व एल १ आहेत. त्यामुळे कंत्राट कुणाला हा पेच निर्माण झाला आहे. त्याचसोबत चारही निविदा एकाच दराचे कशा, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे मुदतवाढ दिलेल्या कंत्राटदाराला अधिकाधिक अवधी मिळावा, यासाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप पवार यांनी केला.
बॉक्स
निपाणे यांच्या कार्यकाळात विभागून कामे
यापूर्वी संजय निपाणे आयुक्त असतांना त्यांच्या कार्यकाळात अशाच पेच निर्माण झाला होता. एकाच वेळी दोन एल १ निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी स्वस्तिक व क्षम्यक या दोन्ही बेरोजगारांच्या संस्थांना हा कंत्राट सारखा विभागून दिला होता. यावेळी मात्र चार एल १ असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया संशयातीत असल्याच आरोप पवार यांनी केला.
बॉक्स
स्थायीला डावलले जात आहे
महपापालिकेतील मोठ्या कामांची निविदा प्रक्रिया ही स्थायी समितीला विश्वासात घेऊन केल्या जाते, असा प्रचलित प्रघात आहे. मात्र, या निविदा प्रक्रियेच्या वेळी स्थायी समितीत विषय आलाच नाही. त्यामुळे सर्व व्यवहार संशयास्पद आहे. कुणाला तरी लाभ देण्यासाठीचा खटाटोप असल्याचा आरोप बसपाचे गटनेते चेतन पवार यांनी केला आहे.
कोट
चार एल १ हा प्रकारच संशयास्पद आहे. अटी, शर्ती घालून निविदा व्यवस्थित करावी व आर्थिकदृष्ट्या मजबूर व्यक्तीला हा कंत्राट मिळाला व जेणेकरून कंत्राटी कर्मचाऱ्याचे वेतन नियमित होईल.
- चेतन पवार,
गटनेता, बसपा