कोरोना चाचणी अहवालाला होणारा विलंब ठरु शकतो घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:40+5:302021-05-25T04:14:40+5:30
वनोजा बाग : तालुक्यात कोरोनाचा कहर सुरु असुन ग्रामीण व शहरी रुग्णांच्या आकडेवारी आणि मृत्यूचे प्रमाण पाहता ...
वनोजा बाग : तालुक्यात कोरोनाचा कहर सुरु असुन ग्रामीण व शहरी रुग्णांच्या आकडेवारी आणि मृत्यूचे प्रमाण पाहता सर्वसामान्य जनतेच्या छातीचे ठोके वाढत चालले आहेत. परंतू रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल प्राप्त होण्यासाठी पाच दिवसा पेक्षा जास्त वेळ लागत असल्याने तो विलंब घातक ठरण्याची चिन्हे आहेत.
तालुक्यातील ग्रामिण भागातील बऱ्याच गावात दिवसेंगणीक होत असलेला कोरोनाचा विस्फोट व बाधीत रुग्णापैकी होणारी मृत्यूची आकडेवारी चिंताजनक आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना जागरुक नागरिकांचा कल आपली तपासणी करण्याकडे आहे.
लखाड येथील एका कुटुंबात १४ मे रोजी एक जण पॉझिटिव्ह निघाल्यानंतर कुटूंबातील सर्वांनीच दुसऱ्या दिवशी कोरोना चाचणी करुन घेतली. त्यातील दोघांची अँन्टीजन टेस्ट निगेटीव्ह आली. परंतू एकाची आरटीपीसीआर टेस्ट केल्याने रिपोर्ट यायची वाट पहावी लागली. तब्बल पाच दिवसानंतर संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संक्रमित रुग्णाच्या संपर्कात येणारी व्यक्ती काळजीने आपली तपासणी करुण घेण्यास तयार आहे. परंतु अहवाल मिळण्यास उशिर होत असल्याने जो व्यक्ती संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेला असतो. त्यामुळे धोेका अधिक वाढतो.