बडनेऱ्यात मुख्य मार्गालगतचे डम्पिंग हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:48+5:302021-04-13T04:11:48+5:30
बडनेरा : रेल्वे स्थानक व गांधी विद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गालगत अवैध डम्पिंग परिसरतील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक आहे. त्यातील प्लास्टिक ...
बडनेरा : रेल्वे स्थानक व गांधी विद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गालगत अवैध डम्पिंग परिसरतील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक आहे. त्यातील प्लास्टिक जाळले जात आहे. त्यामुळे ते तात्काळ हटविण्यात यावे, असा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे.
जुनीवस्तीतील दैनंदिन उचलण्यात आलेला कचरा गांधी विद्यालय मार्गावर नाल्याकाठी टाकला जातो. तिलक नगर व संजीवनी कॉलनीवासीयांना या अवैध डम्पिंगचा त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्यातील प्लास्टिक जाळले जात असल्याने परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. भीम आर्मीचे शहराध्यक्ष प्रदीप उसरे यांनी महापालिका आयुक्तांना एक निवेदन देऊन तेथील डम्पिंग तात्काळ हटविण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा दिला आहे.
धीरज गुप्ता, शुभम मारवे, मंगेश पंडित, रवि समुद्रे ,अभय मारवे, विकास मारवे, गणेश अण्णा, धीरज करिहार, कुणाल करिहास, सोनू समुद्रे, एहसान खान, कलीम खान, इलियास खान आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्लास्टिक पेटविल्यामुळे काही दिवसांपूर्वी ढिगाऱ्याला आग लागली होती. ती विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब बोलाविण्यात आले होते.
बारीपुरा परिसरातदेखील अवैध डम्पिंग करून ठेवण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्यासह मोठ्या दुर्घटनेची शक्यता यामुळे नाकारता येत नाही.
-------