कांडलीतील ध्येयवेड्या युवकाची दिल्ली ते कारगील 'तिरंगा' दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:00 AM2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:33+5:30

लहानपणापासूनच देशभक्ती आणि सैन्यदलाप्रती ओढ असलेल्या सुमितने इयत्ता बारावीनंतर शिक्षण सोडले. सैन्यात भरती होण्याकरिता आवश्यक शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम बनविले. यासाठी अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, भंडारासह विदर्भातील जिल्हा मुख्यालयी भरती परीक्षा दिल्यात. शारीरिक क्षमताही सिद्ध केली.

Delhi-Kargil 'tricolor' tour of target youngsters in Kundali | कांडलीतील ध्येयवेड्या युवकाची दिल्ली ते कारगील 'तिरंगा' दौड

कांडलीतील ध्येयवेड्या युवकाची दिल्ली ते कारगील 'तिरंगा' दौड

Next
ठळक मुद्देजिद्द : सैन्यदलात दाखल होण्याचे स्वप्न

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील कांडली येथील २२ वर्षीय सुमित गौर नामक युवकाने भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी खांद्यावर तिरंगा घेऊन दिल्ली ते कारगील, अशी दौड लावली आहे. ५ डिसेंबरला दिल्लीच्या इंडियागेटवरून तो कारगीलच्या दिशेने निघाला. १०६८ किलोमीटरचे हे अंतर पूर्ण करून भारतीय सैन्यदलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तो भेटणार आहे. सैन्यदलात भरती करून घेण्याबाबत सुमित त्यांना विनवणी करणार आहे.
लहानपणापासूनच देशभक्ती आणि सैन्यदलाप्रती ओढ असलेल्या सुमितने इयत्ता बारावीनंतर शिक्षण सोडले. सैन्यात भरती होण्याकरिता आवश्यक शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम बनविले. यासाठी अमरावती, अकोला, बुलडाणा, नागपूर, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, भंडारासह विदर्भातील जिल्हा मुख्यालयी भरती परीक्षा दिल्यात. शारीरिक क्षमताही सिद्ध केली. प्रत्येक बाबतीत सरस ठरलेल्या सुमितचे भरती परीक्षेदरम्यान संबंधित यंत्रणेने कौतुकही केले. पण, प्रत्येक वेळी काही सेंटीमिटरच्या उंचीअभावी तो मागे राहिला.दरम्यान, देशप्रेम आणि देशसेवेच्या अनुषंगाने सुमितने परत एकदा प्रयत्न करण्याचा विचार केला आणि सैन्यात भरती होण्याकरिता ही दिल्ली ते कारगील दौड त्याने सुरू केली. रस्त्याची त्याला फारशी माहिती नसली तर नॅशनल हायवेच्या मदतीने तो कारगीलच्या दिशेने सोनीपत, पाणीपत, पठाणकोटच्या पुढे निघाला आहे.

Web Title: Delhi-Kargil 'tricolor' tour of target youngsters in Kundali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Soldierसैनिक