सनियंत्रण समिती बैठकीला विलंब अध्यक्षांनी मागितला खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:17 PM2017-11-21T23:17:30+5:302017-11-21T23:18:47+5:30
जिल्हा परिषद पंचायत विभागाने ‘आमचं गाव,आमचा विकास’ आराखडाअंतर्गत जिल्हास्तरीय सनियंण समितीची बैठक अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आयोजित करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद पंचायत विभागाने ‘आमचं गाव,आमचा विकास’ आराखडाअंतर्गत जिल्हास्तरीय सनियंण समितीची बैठक अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. नियोजनाप्रमाणे ही सभा दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात बोलविण्यात आली होती. मात्र, ही बैठक तब्बल दीड तास म्हणजेच दुपारी १.३० वाजता बैठकीला येण्यासाठी अध्यक्षांना आवतन देण्यासाठी पंचायत विभागाचे अधिकारी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या दालनात पोहोचले असता अध्यक्षांनी संनियंत्रण समितीची सभेची वेळ किती वाजता होती, असा प्रश्न उपस्थित करीत ज्यावेळी बैठकीला हजर राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी नियोजित वेळेवर सभागृहात पोहोचले त्यावेळी एकही कर्मचारी वा अधिकारी तेथे उपस्थित नव्हते. या प्रकारावर अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी संताप व्यक्त करीत बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी बैठकीसाठी वेळ व दिवस अगोेदरच निश्चित केल्यानंतर प्रशासनाकडून पदाधिकारी हजर अन् कर्मचारी अधिकारी गैरहजर असा प्रकार दिसून आल्याने २१ नोव्हेंबर रोजी अध्यक्षांनी जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या डेप्युटी सीईओंना संनियत्रण समिती बैठकीला विलंब केल्याप्रकरणी लेखी स्वरूपात खुलासा दोन दिवसात सादर करण्यात यावा, असे पत्र अध्यक्षांनी पंचायत विभागाला दिले आहे.
संनियत्रण समितीची बैठक असल्याने नियोजित वेळी सभागृहात पदाधिकारी पोहचले. मात्र, त्या ठिकाणी कुणीही हजर नव्हते. तब्बल दीड ते दोन तास उशिरा ही सभा सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाला शिस्तीचा विसर पडल्याचे अनेकदा अनुभवले. याला चाप बसणे आवश्यक आहे.
- नितीन गोंडाणे,
अध्यक्ष जिल्हा परिषद